शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वाळव्यात २० तलवारी जप्त दोघांना अटक : गुंडाविरोधी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:53 IST

गुंडाविरोधी पथकाने वाळवा येथे छापा टाकून २० धारदार तलवारी जप्त केल्या. त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देपुढे ते दोन हजार रुपयाला एक तलवार विकणार होते,

सांगली : गुंडाविरोधी पथकाने वाळवा येथे छापा टाकून २० धारदार तलवारी जप्त केल्या. त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने पथकाने अटकेतील दोघांकडे कसून चौकशी सुरु ठेवली आहे. 

सोमनाथ दिनकर पाटील (वय ३५, रा. पेठभाग, वाळवा) व हणमंत काकासाहेब जाधव-डवंग (४५, माळभाग, साखराळे रस्ता, वाळवा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पाटील याच्या घरावर छापा टाकून १२, तर जाधवच्याय घरातून आठ तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी नव्या कोºया आणि धारदार आहेत. त्याची मूठ पितळी आहे. दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. तसेच सोमवारी रात्री जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेत गुंडाविरोधी पथक सहभागी झाले होते. त्यावेळी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील व हणमंत जाधव यांच्याकडे तलवारींचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री दोघांच्या घरावर छापा टाकला. दोघांच्या घरझडतीमध्ये २० धारदार तलवारी सापडल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक शरद माळी, हवालदार महेश आवळे, अरुण औताडे, मेघराज रुपनर, शंकर पाटील, सचिन कुंभार, सागर लवटे, वैभव पाटील, कुबेर खोत, प्रफूल्ल सुर्वे, संतोष गळवे, संकेत कानडे, आर्यद देशिंगकर, मोतीराम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

आॅनलाईन मागविल्याअटकेतील पाटील व जाधव यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी ‘इंडिया मार्ट’ यांच्याकडून त्यांनी या तलवारी आॅनलाईन मागविल्या होत्या. प्रत्येक एक तलवार त्यांना एक हजार रुपयाला मिळाली होती. पुढे ते दोन हजार रुपयाला एक तलवार विकणार होते, अशी माहिती तपसातून पुढे आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली