शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप विभागाने महिन्यात पकडले ५९१ डास! ; ‘क्युलेक्स’ डासांची संख्या सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:33 IST

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.

ठळक मुद्देअ‍ॅनाफिलीस : मलेरिया; क्युलेक्स : हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर; एडीस : डेंग्यू, चिकुनगुण्यासाथ नियंत्रणासाठी उपाययोजना

शरद जाधव ।सांगली : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असताना चिकुनगुण्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्यांची घनता तपासण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात हिवताप विभागाने तांत्रिक तपासणीसाठी विविध जातींचे ५९१ डास पकडले असून, त्याआधारे ज्या त्या भागात असलेले आजार व त्यावरील उपाययोजनेसंदर्भात प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

डेंग्यूसह चिकुनगुण्या, मलेरियासह इतर आजारांचे मूळ कारण डास असल्याने प्रशासनाने डास पकडण्याची मोहीम राबविल्याचा भास होत असला तरी, त्यात तथ्य नसून, तांत्रिक तपासणीसाठी त्या त्या भागात कोणत्या डासांची संख्या अधिक आहे, या डासांमध्ये कोणता रोग पसरविण्याची क्षमता आहे, याचा अहवाल तयार करण्यासाठी डासांची तपासणी केली जाते.

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात एडीस एजिप्तीया, अ‍ॅनाफिलीस व क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यात क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्यानंतर अ‍ॅनाफिलीस डासांची संख्या असून, डेंग्यूला कारणीभूत असणाºया एडीस डासांची संख्या तिस-या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत १६ गावांमध्ये प्रशासनाने हा सर्व्हे केला आहे.

असे पकडले जातात डास --- डास अळींचे प्रमाण आढळलेल्या भागात अडीच तासांच्या कालावधित प्लास्टिकच्या नळीच्या माध्यमातून डास पकडले जातात. पकडलेले डास परीक्षा नळीत घेऊन त्याचे परीक्षण करून त्याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकेला दिला जातो, जेणेकरून संभाव्य रोगावर नियंत्रण मिळविणे त्यांना शक्य होईल. जिल्ह्यात कीटक संहारकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. 

जिल्ह्यातील या भागात मोहीमजिल्ह्यात संजयनगर, पेड, वड्डी, मिरज-खणभाग, सावळी, उमदी, रामपूर, अभयनगर-सांगली, कवठेपिरान, तुंग, वाझर, पलूस, मालगाव, आटपाडी, मौजे डिग्रज आणि बुधगाव या १६ गावांतील डासांची घनता तपासण्यात आली.

 

प्रशासनाकडून डास पकडून त्याची घनता काढली जाते. या तपासणीत आढळून येणाऱ्या डासांमुळे कोणता आजार होऊ शकतो याबाबत माहिती दिली जाते. ज्या त्या भागातील डासांची माहिती मिळाल्याने उपाययोजना करणे सोईचे होते.- डॉ. विवेक पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

 

 

 

टॅग्स :Sangliसांगली