शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

सांगलीत भरदिवसा सराफाचे १८ तोळे दागिने, रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 15:57 IST

माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत ही घटना घडली. या चोरीनंतर त्यांचा कामगार विक्रमसिंह रायसिंह (रा. राजस्थान) हा गायब झाला आहे. त्यानेच चोरी केल्याचा संशय आहे.

ठळक मुद्देसांगलीत भरदिवसा सराफाचे १८ तोळे दागिने, रोकड लंपासकामगारावर संशय : बनावट चावीने फ्लॅट उघडला

सांगली : माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत ही घटना घडली. या चोरीनंतर त्यांचा कामगार विक्रमसिंह रायसिंह (रा. राजस्थान) हा गायब झाला आहे. त्यानेच चोरी केल्याचा संशय आहे.दलबरसिंह नित्यानंद कॉम्पलेक्समधील फ्लॅट क्रमांक आठमध्ये राहतात. त्यांचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे. संश्यित रायसिंह हा त्यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी कामाला लागला होता. त्याच्या राहण्याची सोय नसल्याने दलबरसिंह यांनी त्याला स्वत:च्या फ्लॅटमध्ये ठेऊन घेतले होते. दुकानातील कामगार असल्याने दलबरसिंह यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन फ्लॅटची चावी त्याच्याकडे दिली होती.

आठवड्यापूर्वी कारखाना परिसरात रायसिंह याने भाड्याने खोली पाहिली होती. तो तिथे रहायलाही गेला होता. त्यामुळे त्याने दलबरसिंह यांना त्यांच्या फ्लॅट चावी परत केली होती. २६ मार्चला दलबरसिंह दागिन्यांची खरेदी करण्यासाठी परगावी गेले होते. २७ मार्चला ते परत आले. २८ मार्चला शहरात पाणी टंचाई होती. घरात पाण्याचा थेंबही नसल्याने ते सकाळी अकरा वाजता मित्राच्या घरी अंघोळीसाठी गेले होते.मध्यंतरीच्या काळात चोरट्याने दलबरसिंह यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे चार बॉक्स, अडीच लाखाची रोकड, असा एकूण आठ लाखाचा ऐवज लंपास केला. यामध्ये १८ तोळे दागिने होते. दलबरसिंह अंघोळ करुन साडेअकरा वाजता घरी परतले. त्यावेळी त्यांना फ्लॅटचे कुलूप काढलेले दिसले. पण कडी लावलेली होती.

कडी काढून आत गेल्यानंतर त्यांना कपाटातील साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आले. तसेच दागिने व रोकड नव्हती. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी कामगार रायसिंह यास मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान अपार्टमेंट परिसरात घुटमळले. ठसे तज्ञांना कुलूपासह कपाटावर काही ठसे मिळाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे. रायसिंह हा अचानक गायब झाल्याने त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली