शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यक्तीचा पॅन कार्ड क्रमांक वापरून दिल्लीत १८ कोटींची उलाढाल, ३.५० कोटींची जीएसटी चुकवेगिरी

By संतोष भिसे | Updated: March 13, 2023 19:04 IST

प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली, अन् संबंधित व्यकी चक्रावून गेली

सांगली : सांगलीतील व्यक्तीचा पॅन क्रमांक वापरून दिल्लीतील ठगांनी १८ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांची जीएसटी चुकवेगिरी केल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्राप्तीकर विभागाची नोटीस हातात पडल्यानंतर हे गुन्हेगारी कृत्य सांगलीतील नागरिकाच्या लक्षात आले.जीएसटी चुकवेगिरीसाठी गुन्हेगारांकडून सातत्याने नवनवे फंडे वापरले जात आहेत. ते शोधण्यासाठी जीएसटी विभागही डोळ्यांत तेल घालून काम करत आहे. बोगस पॅन कार्डद्वारे फसवेगिरीचे प्रमाण मोठे असल्याचे विभागाला आढळून आले आहे. गेल्या आठवड्यात सांगलीतील एका नागरिकाच्या घरी प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली. त्यात त्याने दिल्ली येथे सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यांत सुमारे १८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे नमूद केले होते. नोटीस पाहून ही व्यकी चक्रावून गेली.आपण आयुष्यात कधीही दिल्लीला गेलो नसल्याचे तसेच तेथे कोणताही व्यवसाय केला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने अधिक चौकशी केली असता दिल्लीमध्ये त्याचा पॅन क्रमांक वापरून घोटाळेबाजाने १८ कोटी रुपयांचा व्यवसाय दाखवल्याचे स्पष्ट झाले.विजयनगर, जतच्या रहिवाशांचीही फसवणूकजिल्ह्यात यापूर्वी विजयनगर (सांगली) येथील एका रहिवाशाचा पॅन क्रमांक वापरून गुजरातमधील व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांची खोबरे विक्री दाखवली होती. त्यातून चार कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला होता. दुसऱ्या एका प्रकरणात जतमधील एका शेतमजुराच्या आधार, पॅन कार्डचा वापर करून कोट्यवधींची बोगस विक्री दाखवण्यात आली होती. या दोघांना जीएसटी विभागाकडून नोटिसा आल्यानंतर फसवेगिरी उघडकीस आली. पॅन व आधार कार्डविषयी बेफिकिरी दाखवल्याने त्यांना नाहक कायदेशीर प्रक्रियेत अडकावे लागले.तुमच्या नावे जीएसटी अकाउंट...?प्रत्येक पॅन कार्डधारकाने आपल्या पॅन व आधार क्रमांकाचा गैरवापर होत नाही ना? याविषयी सतर्क राहायला हवे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्रत्येक एक-दोन महिन्यांनी तपासणी केली पाहिजे. यासाठी gst.gov.in या संकेतस्थळावर टॅक्स पेयर सर्चमध्ये पॅन क्रमांक टाकला असता त्यास संलग्न जीएसटी क्रमांक समजतो. आपला कोणताही जीएसटी नोंदणी क्रमांक अस्तित्वात नसताना संकेतस्थळावर तो दिसत असल्यास फसवणूक सुरू असल्याचे समजावे. त्याविरोधात जीएसटीच्या फ्रॉड्स विभागाकडे तक्रार नोंदवावी. त्यासाठी cbic-gst.gov.in येथे तक्रार करता येते.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमGSTजीएसटी