शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावांना मिळणार बक्कळ पैसा अन् शेतकऱ्यांना २४ तास वीज, सौरऊर्जेतून होणार वीज निर्मिती

By अशोक डोंबाळे | Updated: September 6, 2023 18:23 IST

कृषीपंपांना मिळणार दिवसाही वीज

अशोक डोंबाळेसांगली : कोळसा टंचाई, पावसाने दिलेल्या ओढीमुळे वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. शेतीला दिवसा सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील २५ उपकेंद्रांजवळ १७३ मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यात दोन लाख ५३ हजार १२१ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास मदत होणार आहे.महावितरण कंपनीकडून सौरऊर्जा वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २५ उपकेंद्रांजवळ १७३ मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट महावितरण कंपनीने ठेवले आहे. यापैकी बहुतांशी सौरऊर्जेचे प्रकल्प गायरान जमिनीत उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून प्रयत्न चालू आहेत.

गावातील गायरान जमिनीत साैरऊर्जेचे प्रकल्प राबविल्यानंतर सलग तीन वर्षे ग्रामपंचायतीला प्रति वर्षी पाच लाख रुपये महावितरण कंपनी देणार आहे. यातून गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेच. याशिवाय, शेतकऱ्यांना अखंडित दिवसा वीजपुरवठा होणार आहे. योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

ग्रामपंचायतींना १५ लाख रुपयांचे अनुदान : धर्मराज पेठकरग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन देण्याचा ठराव मंजूर करावेत. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.

शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांचे अनुदानमहावितरणला भाडेपट्टीवर देऊन नियमित उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. किमान तीन एकर जमीन महावितरण उपकेंद्रापासून पाच किलोमीटर परिघात असल्यास एकरी ५० हजार रुपये म्हणजेच हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये वार्षिक भाडे मिळणार आहे. त्यात दरवर्षी पायाभूत वार्षिक भाडेपट्टीवर तीन टक्के वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता पेठकर यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजFarmerशेतकरी