शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सांगली जिल्ह्यातील १७२ पतसंस्थांना टाळे, १ हजार २७५ संस्था सुरु; किती कोटींच्या ठेवी.. वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: July 26, 2025 18:17 IST

जिल्ह्यात पतसंस्थांत ५ हजार कोटींच्या ठेवी

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी १९९६ ते २००८ हा कालावधी प्रचंड खडतर होता. अनेक पतसंस्था राजकीय अड्डा बनल्यामुळे दिवाळखोरीत निघाल्या. जिल्ह्यात १९९६मध्ये १ हजार ४४७ पतसंस्था होत्या. गेल्या २९ वर्षांत १७२ पतसंस्थांना टाळे लागल्यामुळे सध्या १ हजार २७५ पतसंस्था सक्षमपणे चालू आहेत. या संस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळविण्यासाठी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा लढा चालू आहे.विमा संरक्षण नसतानाही अनेक पतसंस्थांच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय, ही निश्चितच सहकारातील अभिमानाची बाब म्हणावी लागेल. अनेक पतसंस्थांची उलाढाल हजारो कोटींवर गेली आहे. बँकांपेक्षाही मोठे व्यवहार पतसंस्थांमधून होत आहेत. या संस्थांमुळेच ग्रामीणसह शहरीचा विकास झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा पतसंस्थांनी पूर्ण केल्या आहेत. सुरळीत चाललेल्या पतसंस्थांमध्ये १९९६-९७ मध्ये राजकीय हस्तक्षेप वाढून तो राजकीय अड्डाच झाला. चुकीच्या पध्दतीने संस्थेतील पैशांची उधळपट्टी केल्यामुळे २००७पर्यंत पतसंस्थांसाठी खूपच अडचणीचा कार्यकाळ होता. १९९६ ते २०२५ या २९ वर्षांच्या कालावधीत ४८७ पतसंस्थांना टाळे लागले. 'सहकार शताब्दी' २००४मध्ये झाली. त्यानंतर दोन तप अनेक पतसंस्था तग धरून आहेत, नव्हे तर प्रगतीच्या शिखरावर गेल्या आहेत.जिल्ह्यात १९९६मध्ये १ हजार ४४७ पतसंस्था होत्या. आज १२७५ पतसंस्था टिकून आहेत. केवळ १०० पतसंस्थांचा अपवादवगळता अन्य संस्थांच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय. पंधरा वर्षांपासून पतसंस्थांतील ठेवीना विमा संरक्षणाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. पतसंस्था फेडरेशनकडून प्रयत्नही सुरू आहेत.

तालुकानिहाय पतसंस्था..तालुका / पतसंस्था संख्यामिरज - ३७५वाळवा - २८८पलूस - १२६जत - १०६कवठेमहांकाळ - ८१खानापूर - ८३शिराळा - ७८तासगाव - ६२आटपाडी - ४३कडेगाव - ३३

शासनाने ठेवीला विमा सरंक्षण दिल्यास पतसंस्थांची आणखी प्रगती होणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने योग्य निकष निश्चित करावेत, अशी आमची मागणी आहे. ज्या संस्था चांगल्या आहेत. त्यांच्याकडून निधी घेऊन तोट्यातील संस्थांना मदतीचे धोरण ही सहकार विभागाची भूमिका चुकीची आहे. पतसंस्थेच्या वैधानिक राखीव निधीवर आधारित लाखापासून ४० ते ५० लाखांपर्यंत विमा संरक्षणाची मागणी केली आहे. - रावसाहेब पाटील, अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था, सांगली