शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:49 IST

गंगाराम पाटील वारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार ...

गंगाराम पाटीलवारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.चांदोली पर्यटन विकासाच्या संदर्भात आज, मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी चांदोलीचा दौरा करून पाहणी केली. त्यानंतर वारणावती येथील वनक्षेत्रपाल कार्यालया शेजारील अभ्यागत कक्षात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विकास आराखडय़ात अंतर्भूत असणा-या विविध बाबींवर चर्चा केली.शिराळाची नागपंचमी देश विदेशात प्रसिद्ध असून वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे उत्सवात मनाई करण्यात आली आहे. या उत्सवास पर्याय म्हणून चांदोली येथे पाटबंधारे विभागाची जमीन उपलब्ध करून सर्प उद्यानाची निर्मिती करणे तसेच चांदोली धरणाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून मगर संगोपन केंद्र मगर पार्क तयार करणे, मधुमक्षिका पालन केंद्राची निर्मिती करणे, तरुणांना व या परिसरातील नागरिकांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे कामी योग्य ते प्रशिक्षण तसेच व्यवसाय पूरक सोयी सुविधा जागेसह उपलब्ध करून देणे आदी विविध बाबींवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करत त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सहा.जि.नि.अधिकारी निवास यादव, सहा.वनसंरक्षक गणेश पाटोळे, अजित साजणे, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता  डी.डी.शिंदे, शाखा अभियंता गोरख पाटील, वनपाल हारूण गारदी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन