शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:22 IST

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत.

मुंबई : गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. दागिन्यांतील, साड्यांतील वैविध्यता, तसेच फराळातील पारंपरिक निराळेपण आणि जागरणांचा खेळ या साऱ्यांचा समावेश असल्याने गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवातील चैतन्य द्विगुणित झाले आहे. 'आली गौराई अंगणी, तिचे लिंबलोण करा,' असे म्हणत सगळे तिच्या सेवेत गुंतले आहेत. भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यात येते. त्यानुसार सायंकाळी ५:२५ च्या मुहूर्तापर्यंत ज्येष्ठ-कनिष्ठ गौरीचे स्वागत घरोघरी झाले आहे. त्यानंतर सोमवारी गौरी पूजन, तर मंगळवारी विसर्जन होणार आहे.

गौराईच्या पूजेसाठी सोनकी, ताग, शेवंती, करवीर, जुई, जाई, भोपळ्याचे फूल, केवड्याचे पान-फूल, तेरडा, सुपारी, आघाडा, तुळशीपत्राला विशेष मागणी असते. गौराईच्या सजावटीत आणि पूजेत कृत्रिम वस्तूंपेक्षा रानफुलांची सुगंधी आरास केली जाते. त्यामुळे रानफुलांना आणि रानभाज्यांनाही मागणी या दिवसांत वाढते, अशी माहिती जाणकारांनी दिली.

१६ भाज्या, कोशिंबीर, वडे, मिठाई

- गौराई म्हणजे गणपतीची आई. ती माहेरी १ आल्याने तिच्या आगमनापासून विविध फराळ तिच्यासाठी तयार केले जातात. यामध्ये पिठाच्या करंजीपासून ते तिळाचे लाडू, मोदक, बेसन लाडू यांचा समावेश असतो. यामध्ये कमीत कमी १५ ते १६ मिठाई, गोडपदार्थ ठेवण्याची मान्यता आहे.- नैवेद्यासाठी पुरणपोळी, खिरी या 3 मिष्ठान्नाला प्राधान्य दिले जाते. गौरीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी विविध पारंपरिक नैवेद्य दाखवले जात असून, यामध्ये वड्यांपासून पिठलं-भाकरी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, धोंडस अशा पदार्थांचा समावेश असतो.-गौरीला विसर्जनाच्या दिवशी दही-भाताचा ३ घास आवर्जून भरवला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनावेळी हळदी-कुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी घेण्याची प्रथा आहे.

ओवशाची प्रथागौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा. कोकणात खास करून ही परंपरा आजही जपली जाते. नववधूसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या मिठाई, पाच भोपळ्याची पाने आदी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात. ते सूप गौरी पुढे ठेवतात आणि आशीर्वाद घेतात.

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र