शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जास्त पझेसिव्ह असलेल्या पार्टनरला कसं कंट्रोल कराल? या टिप्स ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:57 IST

Relationship Tips : या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Relationship Tips : पझेसिव्हनेस म्हणजे अतिसंवेदनशील असणं हा एक स्वभाव आहे. कधी गर्लफ्रेन्डबाबत तर कधी बॉयफ्रेन्डबाबत याचा उल्लेख केला जातो. काही कपलच्या प्रेमाच्या नात्यात काही काळाने पझिसिव्हनेस येतोच. याचा दोघांनाही त्रास होत असतो. कोणत्याही नात्यात थोडं पझेसिव्ह असणं फायद्याचं आणि गरजेचं असतं, पण ते अधिक प्रमाणात असलं की, समस्या होते. या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

असं वागण्याचं कारण

प्रत्येक व्यक्तीच्या पझेसिव्ह असण्यामागे काहीतरी कारण असतं. ते कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बालपणी त्याच्या किंवा तिच्यासोबत काही घडलं असेल म्हणून कदाचित त्यांचा स्वभाव तसा झाला असावा. जर तुम्हाला ते जाणून घेता येत नसेल तर प्रोफेशनल काऊंसेलरची मदत घ्या.

स्पष्ट बोला

तुमच्या पार्टनरच्या पझेसिव्ह वागण्यामुळे तुम्हाला काय वाटतं, हे त्यांना कळू द्या. पण हे सांगण्यासाठी योग्य वेळेची निवड करा. पार्टनरचा मूड कसा आहे हे बघा आणि मग बोला. तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या अशा वागण्यामुळे काय त्रास होतो हे त्यांना शांतपणे सांगा. 

विश्वास द्या

जर पार्टनरचं पझेसिव्हनेस हे कोणत्या असुरक्षिततेमुळे वाढत असेल तर त्याला त्याबाबत सांगा. पार्टनर याचा विश्वास द्या की, तुमचं त्याच्यावर किंवा तिच्यावर खूप प्रेम आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही. त्याना हेही सांगा की, तुम्ही कधीही त्याचं मन दुखवेल असं काहीही करणार नाही. 

कौतुक

तुमचा पती किंवा बॉयफ्रेन्ड किती पझेसिव्ह असला तरी त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याने केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. याने तुमच्या पार्टनरला असलेली असुरक्षितता दूर होईल. त्याने आधी केलेल्या चुका त्याला सतत दाखवू नका.

रागावर नियंत्रण

पझेसिव्ह व्यक्तीसोबत डिल करणं हे काही सोपं काम नाहीये. अशा व्यक्तीसोबत डिल करताना तुम्ही शांत राहणं फारच गरजेचं असतं. अनेकदा बोलता बोलता तुम्हाला राग येईल पण तुम्हाला रागावर कंट्रोल करावं लागेल. याने परिस्थिती आणखी गंभीर होईल. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप