शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या 'या' ३ क्वालिटींकडे जास्त आकर्षित होतात महिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 12:36 IST

आजच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि बिझी शेड्युलमध्ये कुणाच्या मनात तुमच्याविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी केवळ टॉल, डार्क आणि हॅंडसम असणं पुरेसं नाहीये.

(Image Credit : www.seduccionpeligrosa.info)

आजच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि बिझी शेड्युलमध्ये कुणाच्या मनात तुमच्याविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी केवळ टॉल, डार्क आणि हॅंडसम असणं पुरेसं नाहीये. त्यासाठी काही खास क्वालिटीजही तुमच्यात असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, आम्ही केवळ लूक्सबाबत बोलत आहोत तर तुम्ही चुकताय. फिजिकल क्वालिटीज सोबतच इमोशनल टचही गरजेचा आहे. सोबतच तुमच्यात आत्मविश्वास आणि सेंस ऑफ ह्यूमरही असला पाहिजे. चला जाणून घेऊया त्या तीन खास गोष्टी ज्याकडे महिला होतात अधिक आकर्षित....

सुपरमॅन क्वालिटीज

महिला स्वत: कितीही सक्षम असल्या तरी त्यांची सुरक्षा करण्याची कुणी जबाबदारी घेतली तर त्यांना चांगलं वाटतं. याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कुणाशी भांडावच लागेल. मात्र जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ही बाब दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला हे दाखवून द्या की, कोणत्याही अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवू शकता. तुमच्यासोबत ती सुरक्षित आहे. महिलांना असे पुरुष नेहमीच आवडतात, ज्यांच्यासोबत राहून त्यांना सुरक्षित वाटेल. 

सेंस ऑफ स्टाइल

असं अजिबातच नाहीये की, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी बजेटच्या बाहेर जाऊन केवळ ब्रॅंडेड कपडे किंवा वस्तूच खरेदी केल्या पाहिजे. जर तुम्ही रोडवरुनही काही विकत घेत असाल तर हे ध्यानात ठेवा की, ते तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. तुम्ही त्यात जोकर वाटू नये. सोबतच हाही प्रयत्न करा की, तुम्ही तुमची एक स्टाइल मेंटेन कराल. महिलांना असं अजिबातच वाटत नसतं की, तुम्ही रणवीर सिंग किंवा रणबिर कपूरला कॉपी करावं. त्यामुळे तुम्ही तुमची वेगळी स्टाइल डेव्हलप करुन शकता. 

सेंस ऑफ ह्यूमर 

(Image Credit : thebostoncalendar.com)

महिलांना पुरुषांमधील जी क्लालिटी सर्वात आवडते ती आहे सेंस ऑफ ह्यूमर. महिलांच्या स्वत:च्या कितीतरी समस्या असतात, ज्यांसोबत त्यांना डिल करायचं असतं. अशात त्यांना अशा व्यक्तीची अजिबात गरज नसते जो व्यक्ती आधीपासून डिप्रेशनमध्ये आहे. कधी कधी मूड खराब असणे किंवा तणाव असणे हे सर्वांसोबतच असतं. पण सतत तेच नको असतं. मात्र तुमचा सेंस ऑफ ह्यूमर जर चांगला असेल आणि तुम्ही आजूबाजूच्या लोकांना तुम्ही हसवू शकत असाल, त्यांना मूड चांगला करण्याची क्लालिटी तुमच्यात असेल तर महिलांना असे पुरुष फार आवडतात. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व