शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

​शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणाल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 12:26 IST

एकतर्फी प्रेम ते मुलाकडून असो की मुलीकडून असो, यातून नेहमीच वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याचा प्रसंग नेहमीच प्रेम करणाऱ्या मंडळींना येत असतो. यालाही कारण तसे आहे. कारण सध्या खऱ्या प्रेमाची संकल्पनाच बदलू पाहत आहे. प्रेमाचे रुपांतर फिजिकल अट्रॅक्शनमध्ये होताना दिसत आहे.

-रवींद्र मोरे प्रेम या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी ठरलेल्या आहेत, वर्तमानपत्र उघडले की, एक तरी चांगली, वाईट बातमी प्रेमातून घडलेल्या प्रसंगातून वाचावयास मिळते. मुले-मुली वयात आली की, अट्रॅक्शन होणे हे स्वाभाविक आहे. मात्र अट्रॅक्शनमुळेच एकतर्फी प्रेमाचा जन्म होतो. एकतर्फी प्रेम ते मुलाकडून असो की मुलीकडून असो, यातून नेहमीच वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याचा प्रसंग नेहमीच प्रेम करणाऱ्या मंडळींना येत असतो. यालाही कारण तसे आहे. कारण सध्या खऱ्या प्रेमाची संकल्पनाच बदलू पाहत आहे. प्रेमाचे रुपांतर फिजिकल अट्रॅक्शनमध्ये होताना दिसत आहे. फिजिकल अट्रॅक्शन हे प्राण्यांमध्येही असते आणि मानव हा प्राण्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. फिजिकल अट्रॅक्शनला आपण प्रेम म्हणाल का? जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. शरीर सुखाच्या भावनेपेक्षा मनोमिलनाची भावना स्वत:मध्ये जागृत करा. तेव्हाच तर तुम्ही खऱ्या प्रेम योगाचा खरा आनंद प्राप्त करू शकाल. आपण समाजात पाहतो, दररोज प्रेमावरून काही ना काही घडत असते. एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. कोणी आपल्या प्रेयसीचे नाव हातावर गोंदून घेतो, तर कोणी ब्लेडने स्वत:वर वार करून घेतो. एवढेच नाहीतर प्रियकरासाठी काही तरूणी स्वत:चा जीव देण्यासाठीही मागे- पुढे पाहत नाहीत. काही मुले तर प्रेमात स्वत:ला विसरून जातात व आपल्या रक्ताने प्रेयसीला पत्र लिहून प्रेम किती नि:स्वार्थ आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.अशा परिस्थिती प्रेयसी सोडून गेली तर तिचा खून करण्यातही आजचे 'प्रेम दिवाने' मागे राहत नाही, याला काय म्हणणार? खून अथवा आत्महत्या करण्यामागे 'प्रेम' नाही तर 'कामवासना' हेच खरे कारण आहे. 'नि:स्वार्थ प्रेम' हे परमेश्वराच्या प्रार्थनेप्रमाणे असते. जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. 'काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या का रे हृदयी उठला', अशी भावना खऱ्या प्रियकर व प्रेयसीमध्ये असते. प्रेमात त्यागाची भूमिका महत्त्वाची आहे.प्रेमाची व्याख्या ही प्रत्येक प्रियकाराने त्याच्या परीने करून घेतली आहे. प्रेमात पडणं सोपं आहे, मात्र ते निभावणं खूप कठीण आहे.