(Image Credit : Fix Your Relationship Advice)
कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते. नात्यात अडचणी असतील तर काही कपल्स हे त्यांच्या पार्टनरपासून दूर जातात तर काही कपल्स असेही असतात जे त्यांच्या तणावपूर्ण नात्यात अडकूनच राहतात. कधी विचार केलाय का की, लोक अशा नात्यात का राहातत, जिथे त्यांना केवळ त्रास मिळतो?
यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, काही लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरला सोडत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, त्यांचा किंवा त्यांची पार्टनर त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहे. पार्टनरला सोडून ते एकटे राहू शकणार नाहीत. तर दुसऱ्या काही रिसर्चमधून समोर आलं होतं की, लोक त्यांच्या खाजगी गरजांमुळे पार्टनरला सोडत नाहीत. आणि एका तणावपूर्ण नात्यात इच्छा नसतानाही अडकून राहतात. काही लोकांना एकटेपणाची भीती वाटते, तर काही लोकांना वाटत असतं की, त्यांना दुसरा पार्टनर मिळणार नाही.
पण नव्या रिसर्चच्या आधारावर असं म्हटलं जाऊ शकतं की, पार्टनरप्रति सहानुभूतीची भावना असल्याकारणाने लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. पर्सनॅलिटी अॅन्ड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ज्या लोकांना वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्यावर फार जास्त अवलंबून आहे, ते लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. तसेच काही लोक त्यांच्या आनंदाऐवजी पार्टनरच्या आनंदासाठी एका नको असलेल्या रिलेशनशिपमध्ये अडकून राहतात.
हा रिसर्च दोन भागांमध्ये करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० आठवडे साधारण १,३४८ रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या टप्प्यात ५०० अशा लोकांची माहिती घेतली गेली जे ब्रेकअपबाबत विचार करत होते.
या रिसर्चचे मुख्य आणि यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे असिस्टंट सायकॉलॉजीचे प्राध्यापक समेंथा जोएल यांचं म्हणणं आहे की, पार्टनरचं स्वत:प्रति समर्पण बघून लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरसोबत ब्रेकअप करू शकत नाहीत.