शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अशा पुरूषांवर जास्त फिदा होतात महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 13:14 IST

महिलांच्या मनात काय असतं हे कुणीही सांगू शकत नाही, असे म्हटले जाते. पण एका संशोधनातून असे समोर आले आहे.

तसे तर महिलांना कशाप्रकारचे पुरूष आवडतात हा प्रत्येक पुरूषाला पडलेला प्रश्न आहे. महिलांच्या मनात काय असतं हे कुणीही सांगू शकत नाही, असे म्हटले जाते. पण एका संशोधनातून असे समोर आले आहे की, प्रभावशाली नामवंत पुरुषांना बघून महिलांचा तोल जातो. त्या त्यांच्यावर इंप्रेस होतात. अशा पुरूषांसोबत महिला मैत्री करण्यासाठी आतुर असतात. असे पुरूष त्यांना दोन भेटीत नाहीतर एकाच भेट त्यांच्याकडे आकर्षित करून घेतात.

 या शोधातून समोर आले आहे की, खासकरून नेता टाईप लोक महिलांना अधिक पसंत पडतात, ज्यांची समाजात एक वेगळी ओळख आहे. द जर्नल ह्यूमन नेचरमध्ये हा रिपोर्ट पब्लिश करण्यात आला आहे. शोधकर्त्यांनी २६२ सिंगल आशियाई अमेरिकन लोकांवर हा अभ्यास केला, ज्यातून ही बाब समोर आली आहे.

एका डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अभ्यासात विरूद्ध सेक्सच्या लोकांना काही मिनिटे बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. काही वेळानंतर विचारण्यात आले की, ते ज्यांच्याशी बोलले त्यांच्याशी ते पुन्हा डेटवर जाणे पसंत करतील का? ज्यांनी पुन्हा डेट्वर जाणे पसंत केले त्यांच्या डिएनए आणि जिन्सची तपासणी करण्यात आली.

त्या पुरुषांच्या डिएनएमध्ये आढळलं की, त्यांचं जेनेटिक मेकअप हे असं आहे की, त्यांच्यात सामाजिक प्रभुत्व आणि नेतृत्वाचा गुण आहे. तेच निवडलेल्या महिल्यांच्या डीएनएमध्ये आढळलं की, त्यांना असा पार्टनर हवा असतो जो कॉम्पिटेटीव्ह असावा पण सोबतच त्यांच्या प्रेमाने बोलणारा आणि वागणारा हवा असतो.

या शोधातून ही बाब समोर आली आहे की, पुरुषांच्या काही खास गुणांमुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात. महिला पुरूषांच्या हुशारीवर मरतात. त्यामुळेच लीडरसारख्या पुरुषांवर महिला अधिक फिदा होतात.

शोधातून असे आढळले की, महिला अशा पुरूषांकडेही आकर्षित होता जे सेंसिटीव्ह असतात. ज्यांची बोलण्याची पद्धत अट्रॅक्टीव्ह असते. सोबतच ज्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपWomenमहिला