शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डच्या राशीनुसार जाणून घ्या तुमच्याबाबत काय विचार करते, सिरीअस आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:33 IST

रिलेशनशिपबाबत आपण कसे आहोत, हे सुद्धा या राशीवरुन जाणून घेऊ शकतो. चला जाणून घेऊ राशीनुसार तुमची गर्लफ्रेन्ड कशी आहे किंवा कशी असेल.... 

ज्योतिष शास्त्रातील १२ राशींच्या माध्यमातून आपण आपल्या स्वभावाबाबत जाणून घेता येतं. आपल्या बोलण्याचा पद्धतीपासून ते आपण काय विचार करत आणि कोणत्या गोष्टी पसंत करतो. हे सगळंच जाणून घेऊ शकतो. रिलेशनशिपबाबत आपण कसे आहोत, हे सुद्धा या राशीवरुन जाणून घेऊ शकतो. चला जाणून घेऊ राशीनुसार तुमची गर्लफ्रेन्ड कशी आहे किंवा कशी असेल.... 

मेष राशी

मेष राशीच्या मुली या स्वतंत्र स्वभावाच्या असतात. रिलेशनशिपमध्ये भरपूर प्रेम आणि उत्साहाचं त्या स्वागत करतात. पण बॉयफ्रेन्ड जर त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा नात्यातील उत्साह कमी होत जातो. 

वृषभ राशी

या राशीच्या मुली स्वत:वर निर्भर असतात. त्यांचा आनंद आणि दु:खं दोन्हीही पार्टनरशी निगडीत असतो. रिलेशनशिपमध्ये भावनाच त्यांच्यासाठी सगळंकाही असतात आणि या मुली वन नाइट स्टॅंडसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. 

मिथुन राशी

आपल्या रिलेशनशिपबाबत या मुली नेहमी सकारात्मक असतात. नातं नेहमी जोशपूर्ण ठेवण्यासाठी त्या नवनवीन प्रयत्न करीत असतात. अशा मुलींसोबत मुलं कधीच बोर होत नाहीत. 

कर्क राशी

खूप प्रेम देण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी तयार असतात या राशीच्या मुली. कर्क राशीचे लोक तसे तर फार इमोशनल असतात, त्यामुळे नात्यात प्रेम कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

सिंह राशी

सिंह राशीच्या मुली रागिट स्वभावाच्या असतात, पण आपल्या पार्टनरला कधी दगा देत नाहीत. जर तुमचं प्रेम खरं असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या प्रेम निभावतात. पण जर पार्टनरने दगा दिला तर यापेक्षा वाईट गर्लफ्रेन्ड तुम्ही बघणार नाही.

कन्या राशी

या राशीच्या मुली खूप समजदार आणि सकारात्मक व्यक्तिमत्वाच्या असतात. पार्टनरला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं या गोष्टीची त्या पूर्णपणे काळजी घेतात. काहीही बोलण्याचा निर्णय घेण्याआधी त्या विचार करतात आणि नंतर पुढे पाऊल टाकतात.   

तुळ राशी

या राशीच्या गर्लफ्रेन्ड फार रोमॅंटिक असतात. या मुली रोमान्समध्ये कधीही निराश करत नाहीत. त्यासोबतच या मुली फार इमानदार आणि नातं निभावणाऱ्या असतात. 

वृश्चिक राशी

या मुली फार चार्मिंग आणि आत्मविश्वासू असतात. पार्टनरसाठी त्या प्रत्येक गोष्ट करतात. तसेच जगासमोर नातं स्विकारण्याचीही त्यांना भीती नसते. आपलं नातं त्या केवळ भावनात्मकच नाही तर शारीरिक रुपानेही परफेक्ट दर्शवतात. 

धनु राशी

या राशीच्या मुली प्रेमातही जोशपूर्ण असतात. त्या पार्टनरला कधीही बोर होऊ देत नाहीत. अशा मुलींसोबत वेळ कधी निघून जातो याचा पत्ताही लागत नाही. या मुली आनंदासोबत पार्टनरला दु:खातही साथ देतात. 

मकर राशी

मकर राशीच्या मुली परिपक्व व्यक्तिमत्त्वाच्या असतात. नातं टिकवण्यात त्या पटाईत असतात. पण मजा-मस्तीचा विषय येतात त्या कमजोर पडतात. वेळेआधीच फार जास्त मॅच्युअर झाल्यामुळे त्यांना सिरिअस गोष्टीत जास्त पसंत असतात.

कुंभ राशी

ज्या मुलांना रिलेशनशिपमध्ये 'स्पेस' हवा असतो, त्यांनी कुंभ राशीच्या मुलींना डेट करावं. कारण या राशीच्या मुली स्वत:ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या यावर विश्वास ठेवणाऱ्या असतात. 

मीन राशी

या राशीच्या मुली संवेदनशील असतात. छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व ओळखणं आणि योग्य वेळेवर गोष्टी सांभाळणे त्यांना खूप चांगलं येतं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप