(Image Credit : Zoosk)
प्रेम ही एक वेगळीच आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडलेली असते त्या व्यक्तीला दिवस-रात्री याची काही पडलेली नसते. प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये किस हा महत्त्वाचा भाग असतो. पहिला किस प्रत्येकालाच आठवत असतो. किस करून दोघांनाही एकमेकांच्या जवळ असल्याची जाणीव होते. किस करताना महिला किंवा पुरूष केवळ शारीरिक रूपानेच नाही तर मानसिक रूपानेही जवळ येतात.
मात्र, महिलांच्या मनात ही उत्सुकता नक्कीच असेल की, किस करताना त्यांच्या पार्टनरच्या मनात कशाप्रकारचे विचार सुरू असतात किंवा ते काहीच विचार न करता किसचा आनंद घेतात का? या लेखात आम्ही सांगणार आहोत की, किस करताना पुरूषांच्या डोक्यात काय विचार सुरू असतात.
१) काही पुरूषांना नेहमीच वाटत असतं की, ते महिलांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने किस करू शकतात. त्यावेळी ते विचार करत असतात की, त्यांची गर्लफ्रेन्ड किंवा पत्नी किती नशीब किती चांगलं आहे की, ते त्यांना किस करत आहेत.
२) किस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. जेव्हा एखादा पुरूष किस करायला सुरूवात करतो तेव्हा तो याचा विचार अजिबात करत नाही की, त्या स्थिती त्यांची पार्टनर सहज आहे की नाही. त्या क्षणाला पुरूष महिलांना डॉमिनेट करत असतात.
३) किस करतेवेळी पुरूषांच्या डोक्यात महिलांच्या सुंदरतेबाबत अनेकप्रकारच्या गोष्टी सुरू असतात. हेच कारण आहे की, ते त्यांचं प्रेम पार्टनरच्या वेगवेगळ्या अंगांना किस करून व्यक्त करतात.
४) पुरूषांना पुढच्या टप्प्यात पोहोचण्याची घाई लागलेली असते. जास्तीत जास्त पुरूष जेव्हा मनभरून किस करतात, तेव्हा त्यांना वाटत असतं की, आता पुढची स्टेप शारीरिक संबंध असावी. हेच कारण आहे की, किस करताना पार्टनरच्या अधिक जवळ जातात.
५) जास्तीत जास्त पुरूषांच्या डोक्यात हे असतं की, किस केल्यानंतर ते इंटिमेट नक्कीच होतील. अनेकदा तर ते औपचारिकता म्हणून किस करतात. त्यामुळेच पुरूष जास्त वेळ किसवर फोकस करू शकत नाहीत.