शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

VIDEO : ​डॉक्टर गुलाटीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमची दारू नक्की सुटेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:19 IST

नुकताच सुनील ग्रोवरने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात एका दारुड्याची भूमिका साकारताना दिसत आहे.

कपिल शर्माच्या शो मधील डॉक्टर गुलाटी म्हणजे सुनील ग्रोवरला आपण ओळखतोच. नुकताच सुनील ग्रोवरने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात एका दारुड्याची भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओद्वारे सुनीलने एक सामाजिक संदेशही दिला आहे.  'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव असून हा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. या व्हिडिओत आवाज स्वत: सुनीलचा असून म्यूझिक डिरेक्टर अमित त्रिवेदी हे आहेत, अशी माहिती सुनीलने ट्विटद्वारे दिली आहे.  हा व्हिडिओ शेअर करताना सुनील म्हटला की, दारू सोडण्यासाठी हा व्हिडिओ पुढील २० दिवस ३ वेळा पाहा, तुमची दारू सुटून जाईल. सुनीलच्या या सव्वा तीन मिनीटाच्या व्हिडिओमध्ये त्याने दारुड्याची भूमिका केली आहे. यात आपल्या या वाईट सवयीमुळे सर्व ठिकाणी त्याला मार खावा लागतो. बिल्ला शराबी नावाच्या या व्यक्तीची प्रॉपर्टी विकली गेली आहे. बायको हैराण आहे, तर कोणी त्याला शिव्या देत आहे. पोलीस काठीने मारत आहे. नशेत टल्ली असलेल्या याला शुद्ध नाही किंवा आपण काय करतोय त्याचा पश्चताप नाही. तुम्ही जादूगार आहात. तुमच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला असेही त्याने त्रिवेदी यांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या ट्विटचे उत्तर देण्यास उशिर केला नाही. ते म्हणाले, ‘सुनील ग्रोव्हर तुझ्यासोबत काम करणंही खूप मजेदार होतं. सुनील ग्रोव्हर तू अलौकिक आहेस.’  सुनील ग्रोव्हरने गाणे गाण्याची ही दुसरी वेळ आहे.  यापूर्वी त्याचे ‘मेरे हज्बैंड मुझको प्यार नहीं करते’हे गाणे हिट ठरले होते. याप्रकारे हे दुसरे गाणे देखील धमाकेदार असेल अशी आशा आहे.   कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे सुनीलने कपिल शर्माचा कॉमेडी शो ला सोडचिठ्ठी दिली. यामुळे सुनीलचे बरेच चाहतेही नाराज झाल्यामुळे शो वर बराच परिणाम दिसून आला.