नवीन वर्षाची सुरूवात नुकतीच झाली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी संकल्प केला असेल. तर काही लोकांनी आपल्या पार्टनरला प्रॉमिस केलं असेल. आयुष्य जगत असताना अनेक लहान मोठ्या कुरबूरी होत असतात. पण काहीवेळा जोरदार भांडण होऊन तुमचा पार्टनर तुमच्यापासून खूप लांब जाण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे आपल्या मानसीक स्थीतीवर परिणाम होत असतो. कारण पार्टनरशी भांडण झालं तर कोणत्याच कामात मनं लागत नाही. कारण आपलं लक्ष पार्टनरचा राग कसा घालवता येईल याकडे असतं.
जबरदस्ती करू नका
जर तुम्हाला तुमचं नातं चांगल्याप्रकारे टिकवायचं असेल तर आपल्या पार्टनरला कधीही कोणत्या गोष्टीसाठी जबरदस्ती करू नका. कारण जर तुम्ही जर एकमेंकांची मनं जपाल तर तुमच्यात भांडण होणार नाहीत. तसंच नातं अधिकाधिक घट्ट होत जाईल. जर तुम्ही पार्टनरला आपली स्पेस दिली नाही तर त्या गोष्टीमुळे पार्टनरला अनसेफ वाटण्याची शक्यता असते. त्यातून दुरावा वाढू शकतो.
प्रश्न विचारताना कंट्रोल ठेवा
जेव्हाही तुम्ही पार्टनरशी बोलत असता त्यावेळी आज घरी काय केलं, काय करत आहेस, ऑफिसमध्ये काय झालं, किती वाजता जेवलीस अश्या टाईपचे प्रश्न असतात. पण असं विचारत असताना पार्टनरला इरीटेट होईपर्यंत प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारताना मर्यादा ठेवा. नाहीतर नात्यांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.
अती काळजी करू नका