शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

पहिली डेट झाली असेल चांगली तर दुसऱ्या डेटची अशी करा तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:35 IST

तेव्हाच तुमच्या नात्याला नवीन वळण मिळेल. चला जाणून घेऊया सेकंड डेटसाठी काय तयारी करावी लागले. 

(Image Credit: www.huffingtonpost.co.uk)

मुंबई : पहिल्या डेटवर जाण्याआधी मुलगा आणि मुलगी दोघांच्याही मनात अनेक प्रश्न सुरु असतात. एक भीतीही वाटत असल्याने पहिल्या डेटमध्ये काही गोष्टी बोलायच्या राहून जातात आणि दुसऱ्यांदा भेटण्याची संधी मिळत नाही. पण जर तुमची पहिली डेट चांगली झाली असेल आणि दुसऱ्यांदाही भेटणार असाल तर दुसऱ्या डेटसाठीही काही तयारी करणे गरजेचे असते. सेकंड डेटला तुम्ही त्या व्यक्तीशी काय बोलायचंय याची तयारी करायला हवी. तेव्हाच तुमच्या नात्याला नवीन वळण मिळेल. चला जाणून घेऊया सेकंड डेटसाठी काय तयारी करावी लागले. 

कशी सुरु आहे लाईफ?

पहिल्या डेटमध्ये नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीच्या महत्वाच्या गोष्टींबाबत त्याला/तिला विचारलं असेल, दैनंदिन कामकाजाबाबत विचारलं असेल. पण आता त्या व्यक्तीला लाइफ कशी सुरु आहे? असा प्रश्न करा. याने तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आणखी काही खास गोष्टी जाणून घेता येईल.

पुढचा प्लॅन

प्रोफेशनल असो वा खाजगी पुढे काय करायचं आहे याबाबत यावेळी विचारायला हवं. पुढील 5 किंवा 10 वर्षात तो/ती काय करणार आहे याबाबत विचारा. 

जे करत आहे त्यात खूश आहे का?

बहुतेकजण हे आपला सर्वात जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवतात. त्यामुळे त्यांना विचारा की, काय ते त्यांच्या नोकरीतून किंवा बिझनेस करुन खूश आहेत का? काय ते समाधानी आहेत? त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचा प्लॅन करण्याआधी हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. 

आयुष्यातील खास लक्षात राहिलेला क्षण

त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील खास लक्षात राहिलेल्या क्षणांबाबत विचारा. अशा प्रकारे काही गोष्टी केल्यास तुमच्यातील संवाद चांगल्याप्रकारे पुढे जाऊ शकतो. 

आधीच्या डेटच्या गोष्टी

तुम्ही आधीच्या डेटमध्ये कोणत्या गोष्टी केल्या याचाही पुर्नरुच्चार करा. किंवा पहिल्या डेटमध्ये काही विचारायचं राहून गेलं असेल ते दुसऱ्या डेटमध्ये विचारा. 

तुम्हाला काय वाटलं तेही सांगा

पहिल्या भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली तेही सांगा. पण ते सांगण्याचीही पद्धत व्यवस्थित असावी. त्या सांगण्यातून त्या व्यक्तीला हे कळू देऊ नका की, तुम्ही त्यांच्याबाबत सिरीअस आहात. 

त्यालाही विचारा भेटून कसं वाटलं?

कोणताही संकोच न करता त्यांना विचारा की, तुम्हाला मला भेटून कसं वाटलं. तो तुमच्याबद्दल काय विचार करतो किंवा करते, याबाबत जरा फिरकी घेऊन प्रश्न विचारा. आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळत असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे आणि बॉडी लॅंग्वेजवर लक्ष द्या. अनेकदा काही लोक केवळ इम्प्रेस करण्यासाठी खोटंही बोलतात. अशावेळी तुम्ही जरा सावध राहायला हवं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट