(Image Credit : IOL)
नात्यांचे धागे फारच नाजूक असतात. छोट्या छोट्या चुकांमुळे नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. जे नातं तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात ते तुटायला काही मिनिटे पुरेसे असतात. काही नाती ऐकमेकांमधील असंमजसपणा आणि अहंकार यामुळे तुटतात. त्यामुळे तुमचं नातं टिकवून ठेवण्यासाठी स्वत:वर लक्ष देण्याची गरज आहे. स्वत:च्या जाणून घेण्याची गरज आहे. जेणेकरून तुटणारं नातं वाचवलं जाऊ शकेल.
१) स्वत:ची काळजी
जोपर्यंत तुम्ही तुमच्या नात्यात आलेल्या अडचणी समजू शकाल, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. हे असं तुमच्या अहंकारामुळे होतं. नकारात्मकता तुमच्या आत्मविश्वासाला नष्ट करते. त्यामुळे तुमची काय चूक झाली हे समजून घ्या आणि आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी एक्सरसाइज करा. पार्टनरला तुम्ही त्यांचेच असल्याची जाणीव करून द्या.
२) थेरपी
नातं सांभाळण्यासाठी तुम्ही थेरपीचा आधार घेऊ शकता. यात दोन्ही पक्षांची बाजू समजून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो. कारण असं नेहमी होत नाही की, काहीच न बोलता एकमेकांचं म्हणणं समजावं. यासाठी तुम्हाला थेरपीचा आधार घ्यावा लागेल. याने गुंतलेल्या गोष्टी सोडवण्यास मदत मिळते.
३) सकारात्मक व्हा
दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वत: सकारात्मक बना. जेणेकरून तुमच्यात होणारे बदल पाहून पार्टनरला सुद्धा बदलण्याची गरज भासावी. नकारात्मकतेचा पराभव करण्यासाठी सकारात्मकता हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे सकारात्मक गोष्टी बघा, वाचा आणि सकारात्मक विचाराच्या लोकांसोबत रहा.
४) पार्टनरचं ऐका
पार्टनरला ऐकणं सुरू करा. ते काय म्हणताहेत, काय बोलताहेत याकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्याकडून काय हवंय, त्यांना काय सांगायचंय याकडे लक्ष द्या. वाद कशावरून होतोय त्याचं कारण विचारा. त्यावर चर्चा करा.
५) एकमेकांना दोष देऊ नका
कुणालाही चुकीचं ठरवणं फार सोपं असतं. पण याने नात्यात दुरावा येऊ लागतो. कोणत्याही नात्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. त्यामुळे आपल्या लोकांना चुकीचं ठरवण्याऐवजी आरामात बसून त्यांना त्यांची चूक दाखवा. हेच रागाने सांगाल तर नातं आणखी बिघडू शकतं.
६) जबाबदारी घ्या
कोणतंही नातं तयार होण्यास आणि बिघडण्याला दोन लोक जबाबदार असतात. फक्त बघायचं हे असतं की, नकारात्मकतेला नकारात्मकपणे नष्ट करायचंय की, तुमच्याकडून झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायचीय. जर तुम्ही असं कराल तर पार्टनरलाही चांगलं वाटेल आणि नातं पुन्हा रूळावर आणण्यासाठी एक नवं कारण मिळेल.