शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

SHOCKING : ​महेश भटचे होते "या" अभिनेत्रीशी अफेयर, अमिताभ बच्चनकडून होता जीवाला धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:31 IST

महेश भट्टचेही नाव एका नायिकेसोबत जोडण्यात आले होते, मात्र त्यांची लव्हस्टोरी खूपच दु:खद असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया त्या लव्हस्टोरीबाबत...

बॉलिवूड डायरेक्टर महेश भट्ट नुकतचे ६९ वर्षाचे झाले. फिल्म इंड्रस्टी आणि लव्ह, अफेयर्स हे जणू समिकरणच आहेत. महेश भट्टचेही नाव एका नायिकेसोबत जोडण्यात आले होते, मात्र त्यांची लव्हस्टोरी खूपच दु:खद असल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया त्या लव्हस्टोरीबाबत... बॉलिवूडमध्ये बऱ्याच जोड्या बनतात आणि तुटतातही. अशीच एक जोडी होती महेश भट्ट आणि परवीन बाबीची. परवीनला १९७७ मध्ये महेश भट्टवर प्रेम जडले होते, विशेष म्हणजे त्यावेळी महेश भट्ट विवाहित होते. महेशचे २० वर्षीय लॉरेन ब्राइटशी लग्न केले होते.  यादरम्यान महेश आणि परवीन दोघेही एक मेकांवर प्रेम करु लागले. विवाहित असूनही महेशने परवीनसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परवीन यशाच्या उच्च शिखरावर होती आणि 'अमर अकबर एंथनी' आणि 'काला पत्थर' यासारख्या चित्रपटांची शुटिंग करत होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि खूप आनंदीदेखील होते.  यादरम्यान १९७९ मध्ये असे काही झाले की, महेश चकित झाले. महेश जेव्हा घरी पोहचले आणि पाहिले की, परवीन फिल्मी ड्रेसमध्ये होती आणि घराच्या एका कोपऱ्यात हातात चाकू घेऊन बसली होती. महेशला पाहून त्यांना शांत होण्यासाठी इशारा केला आणि म्हटली की, ‘बोलू नका, तो मला ठार मारु  इच्छितो...’ अशा परिस्थितीत महेशने परवीनला पहिल्यांदाच पाहिले होते. यानंतर मात्र अशा परिस्थितीत वारंंवार आढळू लागली. जेव्हा तिच्यावर उपचार करण्यात आला तेव्हा समजले की, तिला पॅरानॉइय स्क्रिजोफेनिया नावाचा गंभीर आजार होता.  डॉक्टरांनी या आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक शॉक’ देण्याचे ठरविले होते, मात्र महेश भट्टने परवीनची पूर्णत: साथ दिली आणि तिची काळजीही घेतली. परवीनचे पुर्वीचे बॉयफ्रेंड कबीर बेदी आणि अभिनेता डॅनी यांनी परवीनच्या उपचारासाठी अमेरिकेचे काही चांगले हॉस्पिटलदेखील सुचीत केले आणि मदतही केली. परवीनला नेहमी भीती वाटायची की, कोणीतरी तिला ठार करु इच्छित आहे. तिला वाटत असे की, कोणीतरी तिच्या कारमध्ये बॉम्ब ठेवला आहे.  एवढेच नव्हे तर अभिनेता अमिताभ बच्चनपासूनही तिला भीती वाटू लागली होती. तिला असे वाटत होते की, अमिताभ तिला ठार मारु इच्छित आहे. तिला वाटायचे की, तिच्या कडून अमिताभचे काही नुकसान झाले आहे, म्हणून तो तिला ठार करु इच्छित आहे. दिवसेंदिवस परवीनची तब्बेत जास्तच खराब होऊ लागली आणि महेश परवीनला घेऊन बंगळूरला चालले गेले.