पाहाच, गेल व विराटचा भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 19:44 IST
आयपीएलमध्ये बिझी असलेले विराट कोहली आणि अलीकडे बाप बनलेला क्रिस गेल यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहाच, गेल व विराटचा भन्नाट डान्स
आयपीएलमध्ये बिझी असलेले विराट कोहली आणि अलीकडे बाप बनलेला क्रिस गेल यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएल पार्टीदरम्यानच्या या व्हिडिओत विराट आणि गेल दोघेही बेधूंद होऊन नाचत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत सुमारे दोन लाखांवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शिवाय शेकडो जणांनी आपल्या अकाऊंटवरून तो शेअर केला आहे. गेलच्या गर्लफ्रेन्डने अलीकडे एका गोड मुलीला जन्म दिला. गेलने आपल्या मुलीचे नाव ब्लश असे ठेवले आहे. मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच आनंदाने बेभान झालेला गेल आयपीएल मॅच सोडून मायदेशी रवाना झाला होता. मुलीला डोळे भरून पाहिल्यानंतर तो पुन्हा आयपीएलसाठी भारतात परतला आहे. तो परतला म्हणून त्याच्या आयपीएल टीमने एक जंगी पार्टी दिली. याच पार्टीत विराट व गेल एकत्र डान्स केला आहे. तेव्हा बघाच...