शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Rose Day : समजून घ्या गुलाबाच्या रंगांचा अर्थ; अन्यथा घडेल अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:42 IST

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल. आज या दिवसाची सुरूवात ही रोज डे ने झाली आहे.

(Image Credit : Saida Online)

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल. आज या दिवसाची सुरूवात ही रोज डे ने झाली आहे. आजच्या दिवशी फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात. फार जास्त काही न बोलता समोरच्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे. पण अनेकांना कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय अर्थ असतो हेच माहीत नसतं. त्यामुळे अनेकांची पंचाईत होते. त्यामुळे आम्ही तुमचं हे कोडं सोडवणार आहोत. 

लाल गुलाब (red rose) 

हा गुलाबाच्या फुलाचा प्रेम दर्शवणारा सर्वात कॉमन रंग आहे. लाल गुलाब हा रोमान्स, पॅशन आणि इंटेन्स इमोशनशी संबंधित मानला जातो. हा गुलाब देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे हे व्यक्त करता की, तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. म्हणजे हा लाल गुलाब आय लव्ह यू म्हणण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे.  

पिवळा गुलाब (yellow rose) 

पिवळा गुलाब हा मैत्रीसाठी वापरला जातो. कारण पिवळा रंग हा जोशपूर्ण, तजेलदार आणि उत्साह देणारा मानला जातो. सोबतच पिवळा रंग हा आनंद आणि चांगल्या आरोग्याचा प्रतिकही मानला जातो. म्हणजे तुम्हाला जर मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगायचंय की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, तर त्यांना तुम्ही पिवळा गुलाब देऊ शकता. 

पांढरा गुलाब (white rose) 

(Image Credit : rosesgalore.com)

जर तुमचं तुमच्या एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी एखाद्या कारणावरून जोरदार भांडण झालं असेल. पण आता हे भांडण विसरून तुम्हाला पुन्हा नातं जोडायचं असेल तर पांढऱ्या रंगाचा गुलाबा चांगला पर्याय आहे. पांढरा गुलाब हा साधेपणा, विनम्रता, शांती आणि मनातील चांगल्या गोष्टीचा प्रतिक मानला जातो. 

पिंक गुलाब (pink rose) 

(Image Credit : irqnews.com)

पिंक गुलाब हा समोरच्या व्यक्तीप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. व्हॅलेंटाइन डे हा केवळ पार्टनरसोबत प्रेम करण्यासाठी नसतो. तुम्ही आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करू शकता. त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना पिंक गुलाब देऊ शकता. 

लॅवेंडर गुलाब (lavender rose) 

जर तुम्हाला Love at first site झालं असेल तर तुम्ही लॅवेंडर रंगाचा गुलाब समोरच्या व्यक्तीला देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. खरंतर लॅवेंडर रंगाचा गुलाब सहजपणे मिळत नाही आणि या रंगाचा गुलाब शोधण्यासाठी तुम्हाला फारच मेहनत घ्यावी लागू शकते.  

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे