शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुलं जेव्हा खरंच प्रेमात असतात तेव्हा असे वागतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:10 IST

प्रेम ही जगातली सर्वात चांगली आणि आनंद देणारी भावना आहे असे म्हटले जाते. पण समोरचा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो की, केवळ त्याला आकर्षण वाटतं हेही जाणून घेणं महत्वाचं असतं.

प्रेम ही जगातली सर्वात चांगली आणि आनंद देणारी भावना आहे असे म्हटले जाते. पण समोरचा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करतो की, केवळ त्याला आकर्षण वाटतं हेही जाणून घेणं महत्वाचं असतं. कारण अनेकदा केवळ आकर्षणालाच प्रेम समजलं जातं आणि त्यामुळे नंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण मुलं प्रेमात पडल्यावर कसे वागतात याची काही निरीक्षणे आहेत ते खालीलप्रमाणे सांगता येतील. 

प्रेमात पडल्याची पहिली निशानी

तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो की नाही किंवा त्याचं किती प्रेम आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. तर प्रेमाची पहिली निशानी ही समजली जाते की, तुम्ही कसे दिसता किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग आले आहेत, याने त्याला काहीही फरक पडत नाही. तो केवळ तुम्हाला पसंत करतो आणि तुमच्यासोबत राहून आनंदी राहतो. 

गोडगोड नाही तर खरं बोलतो

जी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली आहे ती व्यक्ती तुम्हाला खूश करण्यासाठी तुम्हाला जे ऐकायला आवडतं ते बोलत नसतो. तो तुम्हाला ते सांगत असतो जे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. अशात त्याच्या त्या गोष्टींवर नाराज होण्यापेक्षा त्याच्या प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

काय परिधान केलंय?

तुम्ही काय कपडे परिधान केले, कसे केले याने त्याला काहीही फरक पडत नाही. किंवा इतर मुली काय परिधान करतात आणि तुम्ही तसं करत नाहीत याचाही त्याला फरक पडत नसतो. कारण त्याला तुमच्या कपड्यांच्या सेन्सपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम असतं. 

तुमच्या कामात तुम्हाला मदत करणे

बाहेर कुठेही जाताना त्याला जर तुमच्यासोबत जाण्याची इच्छा असेल तर याला पझेसिव्हनेस समजू नका. याचा दुसरा भाग असाही असू शकतो की, त्याला प्रत्येक क्षण तुमच्यासोबत घालवायचा असेल. पण याला किती सीमा असावी हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यावा. 

तुम्हाला समजावून सांगणे

प्रेमात गोड गोड बोलणारे खूप असतात. प्रेमात कौतुक करणारेही खूप मिळतात. पण तुमच्या चूकांवर पांघरूण न घालता त्या तुम्हाला दाखवणारे कमी असतात. जे तुमच्यावर खरं प्रेम करतात ते कधीही तुमच्या तुमत्या चूका लपवून ठेवत नाहीत.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट