शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' 4 चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:51 IST

Relationship : काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला नातं टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.

Relationship : कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासवर टिकून असतो. विश्वासामुळेच नातं टिकून राहतं. पण कधी कधी नात्यात असणाऱ्या दोन्ही व्यक्तींकडून असं काही घडतं ज्यामुळे नातं बिघडू लागतं. कपल काही अशा चुका करतात ज्यामुळे नातं दुरावतं. अशाच काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

स्वार्थी होणे

रिलेशनशिपमध्ये समानतेची भावनाच दोन्ही पार्टनरला एकमेकांमध्ये बांधून ठेवते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये केवळ तुमच्या आनंदासाठी असाल, तुम्ही केवळ तुमच्या इच्छांचा विचार करत असाल तर याने तुमच्या पार्टनरला दु:खं होईल. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये स्वार्थीपणा ठेवणे टाळा.

खोटं बोलणे

आपण बालपणापासूनच शिकत असतो की, खोटं फार जास्त काळ लपून राहू शकत नाही. तरी सुद्धा अनेकजण पार्टनरसोबत खोटं बोलतात. पण खोटं टाळलं पाहिजे, खासकरून तेव्हा जेव्हा नातं नवीन असतं. कारण नात्याची सुरूवात खोट्याने झाली तर या नात्यात तुम्हाला आनंद मिळूच शकणार नाही.

फायद्यासाठी नातं

असं गरजेचं नाही की, रिलेशनशिप नेहमी एकसारखंच चालत रहावं. वेळेनुसार जेव्हा तुम्ही एकमेकांना चांगलं समजू लागता तेव्हा आपापसातील वाद समोर येऊ लागतात किंवा एकमेकांसोबत सहज राहू शकत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही ते नातं कायम ठेवलं असेल, मग ते समाजाच्या भीतीने असो वा एकमेकांच्या सुविधेसाठी असो हे नातं तुम्हाला त्रासाशिवाय काहीच देऊ शकणार नाही. असं करणं सुद्धा दगा देण्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.

बोलणं बंद करणे

असं नेहमीच ऐकायला मिळतं की, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाढतात. या गोष्टींना रिलेशनशिपमध्ये फार महत्त्व असतं. तुम्ही आपसात भांडण करता किंवा एखाद्या वेगळ्याच कारणाने रिलेशनशिप सुरळीत नसेल तर एकमेकांशी बोलणं बंद करता. हे फारच चुकीचं आहे. याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा पार्टनरसोबत बोला. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप