शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही तुमच्या पार्टनरला खूप मेसेज करता, जाणून घ्या यावर एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 14:00 IST

Relationship : मेसेज करण्याची सवय सुद्धा रिलेशनशिपमध्ये समस्या ठरू शकते. याबाबत एक रिसर्च करण्यात आला असून त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

Relationship : व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक मेसेंजर या दोन गोष्टी प्रेमात असलेल्या कपल्ससाठी जणू वरदानच आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेसेज करून कपल एकमेकांच्या मनातील गोष्टी व्यक्त करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तुम्ही पाठवलेला मेसेज तुमच्या नात्याबाबत खूपकाही सांगतो. मेसेज करण्याची सवय सुद्धा रिलेशनशिपमध्ये समस्या ठरू शकते. याबाबत एक रिसर्च करण्यात आला असून त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

हा रिसर्च ब्रिंघम यंग युनिव्हर्सिटीमधील अभ्यासकांनी केला आहे. यात २७६ लोकांचा समावेश करून घेण्यात आला होता. यातील 38 टक्के लोकांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला. 46 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या पार्टनरसोबत एंगेज्ड आहेत आणि 16 टक्के लोकांनी सांगितले की, ते विवाहित आहेत.

तसेच 82 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या पार्टनरला दिवसभर अनेकदा मेसेज करतात. त्यांनी सांगितले की, या मेसेजमधून ते प्रेम व्यक्त करतात, त्यात प्रेम असतं. तर जास्तीत जास्त लोकांनी सांगितले की, ते त्यांची समस्या सोडवण्यासाठी पार्टनरला मेसेज करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर जास्तीत जास्त चॅटींग एखादा वाद मिटवण्यासाठी आणि पार्टनरला मनवण्यासाठी करतात.

या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, टेक्स्ट मेसेजचा वेगवेगळ्या जेंडरवर काय प्रभाव पडतो. जसे की, पुरूष जास्तीत जास्त मेसेज त्यांच्या रिलेशनशिपमध्ये संतुष्टी कमी असल्याने करतात.

त्याचप्रमाणे महिला सुद्धा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सुरू असलेल्या समस्या दूर करण्यासाठी मेसेज करतात. महिला या मेसेजिंगमध्ये आपल्या पार्टनरला माफी मागण्यापासून ते नातं कायम ठेवण्यासाठी विनंती करणारे मेसेजे लिहितात.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप