शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:25 IST

प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत.

-रवींद्र मोरे सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचे प्रेमसंबंध आपणास माहित आहेच. त्यांचे नाते का तुटले याचे मुख्य कारण सांगता येईल ते म्हणजे सलमानचे ऐश्वर्यावर असणारे अति प्रेम. बॉलीवूडमध्ये या व्यतिरिक्त अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचे प्रेमसंबंध फक्त अति प्रेमामुळे संपुष्टात आले. प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या लोकांमध्ये लवकर प्रेम करण्याची क्रेझ दिसून येत असून याचा परिणाम तेवढ्याच लवकर एकमेकांपासून लांब होण्याच्या घटना घडत आहेत. या घटना का घडत आहेत, त्याची कारणे शोधण्यासाठी नेमके हे संशोधन करण्यात आले. दोघांमधील गरजेपेक्षा जास्त पे्रम त्यांना एकमेकांपासून लांब होण्यास जबाबदार ठरत असल्याचे या संशोधनात आढळले आहे. जेव्हा एक पार्टनर खूपच प्रेम करतो, तेव्हा तो समोरच्या पार्टनरकडून तशाच प्रेमाची अपेक्षा करतो. जर दुसरा पार्टनर या अपेक्षाला समजू शकला नाही किंवा पूर्ण करू शकला तेव्हा त्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागतात. नेमके याच समस्या भविष्यात नात्यासाठी धोकादायक ठरतात. यात एक पार्टनर असा समजतो की, माझ्या प्रेमाची समोरच्याला काही किंमतच नाही आणि दुसरा असा विचार करतो की, माझ्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण होत आहे. अशी परिस्थिती आल्यावर दोघेही स्वत:साठी काहीतरी नवे शोधणे सुरु करतात.   * काय आहेत लक्षणेआपल्या स्वातंत्र्यात कोणी अडसर निर्माण होणे हे कुणालाच आवडत नाही. प्रेम करणे आणि ते जाहिर करणे ही वेगळी गोष्ट आहे, मात्र याला आपण कोणावर बळजबरीने थोपवू शकत नाही. जर आपला पार्टनर आपल्या प्रेमानुसार अपेक्षित प्रतिसाद देत नसेल तर घाई न करता त्याच्याशी संवाद साधून आपले म्हणणे समजवू शकता.आपल्या नात्याला वेळेनुसार विकसित करण्याचा प्रयत्न करा. बहुतांश आपण वेळेनुसार खूप बदलतो मात्र आपल्या पार्टनरकडच्या आपल्या अपेक्षा पुर्वीसारख्या तशाच असतात. जेव्हा नात्याच्या सुरुवातीला जसे आणि जेवढे प्रेम करतो आजही तसेच वागत असाल आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा करीत असाल तर असे वागणे आपल्या नात्यासाठी घातक समजावे. कारण या अति प्रेमामुळे आपण जेवढे प्रभावित व्हाल तेवढाच आपला पार्टनरदेखील प्रभावित होईल. अशीच परिस्थिती कायम राहिली तर आपला पार्टनर त्रस्त होऊन आपल्यापासून कायमचा लांब जाऊ शकतो. यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि आपले नाते जपून ठेवा.