शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Relation : ‘या’ फायद्यांमुळे मुलांना आवडते ‘लिव्ह इन...' मध्ये राहणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 18:05 IST

लिव्ह-इनमध्ये राहण्याचे इतरही सकारात्मक फायदे आहेत. काही मुख्य कारणांमुळे मुलांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची अधिक इच्छा होते. जाणून घ्या ती कारणे

बऱ्याच चित्रपटांचा आशय हा लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे. विशेषत: असे चित्रपट तरुणाईवर आधारित असल्याने या चित्रपटांकडे तरुणवर्ग जास्त खेचला जातो. सध्या बदलत्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून ‘लिव्ह इन...’ कडे पाहिले जाते. एकंदरीत सध्याच्या तरुणाईलाही लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणे अधिक आवडते. यामध्ये लोक स्वत:ला अधिक कम्फर्टेबल मानतात. लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहिल्याने आपल्या जोडीदाराविषयी अनेक गोष्टी समजून घेता येतात असे मुलांना वाटते. या गोष्टी पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी ठरतील असेही त्यांना वाटते.लिव्ह-इनमध्ये राहण्याचे इतरही सकारात्मक फायदे आहेत. खालील काही मुख्य कारणांमुळे मुलांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची अधिक इच्छा होते.  * प्रेम वाढते लिव्ह-इनमध्ये राहिल्याने एकमेकांच्या सहवासात एकमेकांचे गुणदोष समजून घेणे शक्य होते. शिवाय दोघांना एकमेकांसाठी भरपूर वेळ देता येतो म्हणून दोघांमधील प्रेम अधिक वाढते. यामुळे त्यांचे नाते दृढ होते आणि भविष्यात एकमेकांपासून लांब होण्याची शक्यता कमी होते. * एकमेकांच्या कामात सहभाग वाढतोलिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहताना तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल तरी मिळून काम करावे लागते, यामुळे काम वाटून घेण्याची सवय लागते. शिवाय एकमेकांच्या कामात एकमेकांचा सहभाग वाढतो, यातच एकमेकांचा स्वभाव देखील कळतो. * लग्नापूर्वीच संसारिक आयुष्याचा अनुभव लिव्ह-इनमध्ये राहिल्याने प्रेम तर वाढतेच शिवाय संसारिक आयुष्याचा अनुभव मिळतो. या कारणामुळे मुले मुलींच्या तुलनेत लिव्ह-इनला जास्त पसंती देतात. * पैशांची समस्या जाणवत नाहीमुलगा आणि मुलगी एकमेकांच्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी लिव्ह-इनमध्ये राहतात. या अनुभवातून दोघेही एकमेकांना समजून घेतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या एकमेकांना सांभाळून घेण्याची जबाबदारीही दोघे मिळून घेतात. दोघेही नोकरी करणारे असतील तर समस्या अधिक सोपी होते.  * भविष्याचे नियोजन करता येतेलिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर दोघांना पुरेसा वेळ मिळतो त्यामुळे एकमेकांचे प्रेम तर वाढतेच शिवाय भविष्याचेही नियोजन करायलाही दोघांना वेळ मिळतो. त्यामुळे बऱ्यापैकी अचूक नियोजन करता येते.