शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

या कारणांनी प्रेमात पार्टनरला दगा देतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 13:43 IST

व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तीत्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

प्रेमात मिळालेल्या दग्यातून सावरणं हे कुणासाठीही सोपं नसतं. ज्या व्यक्तीवर आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करतो ती व्यक्तीच जेव्हा साथ सोडून जाते तेव्हा जगण्यातला उत्साहच निघून जातो. ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण याचं नेमकं कारण काय आहे हे त्यांच्या राशीमध्ये दडलं आहे. व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तित्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

मेष राशी

मेष राशीचे लोक हे चंचल स्वभावाचे असतात. त्यांना त्यांच्या अंदाजात आयुष्य जगायचं असतं. प्रत्येकवळी काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्यात त्यांना आनंद मिळतो. पण जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना एका साच्यात बांधायला लागतात तेव्हा ते त्यांच्यापासून दूर होऊ लागतात. काही भलेही सोबत राहत असतील पण त्यांच्यात प्रेम राहत नाही. अशावेळी हे दूर जाणं ब्रेकअपचं कारण बनतं. 

वृषभ राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं की, त्यांच्यासोबत पार्टनर चुकीचं वागत आहे तेव्हा ते स्वत:हून पार्टनरपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. नातं जेव्हा केवळ फक्त नावाला शिल्लक राहतं, तेव्हा हे लोक नातं संपवण्यासाठी ठोस पाऊल उचलतात. 

मिथुन राशी

या राशीच्या लोकांना फ्लर्ट करण्याची वाईट सवय असते. अनेकदा हे लोक फ्लर्ट करताना आपल्या सीमा विसरुन जातात हेच त्यांना महागात पडतं. त्यांचा फ्लर्ट करण्याचा स्वभावच त्यांना पार्टनरला दगा देण्याला भाग पाडतो. 

कर्क राशी

प्रेम या राशींच्या लोकांसाठी सगळंकाही असतं. पार्टनरला भरभरुन प्रेम देणे, पार्टनरकडून प्रेमाची अपेक्षा करणे हेच या लोकांना यशस्वी नातं वाटत असतं. आणि जेव्हा पार्टनरकडून भरपूर प्रेम मिळत नाही तेव्हा नात्यात दरी निर्माण होते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सतत त्यांना काय हवंय, त्यांचा आनंद कशात आहे, ते काय करत आहे, या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवावं. पण त्यांच्या या अपेक्षा पार्टनर जेव्हा पूर्ण करु शकत नाही, तेव्हा या राशीच्या लोकांचा त्या नात्यातील इंटरेस्ट कमी होतो.

कन्या राशी

असे म्हणतात की, सफाईदारपणे खोटं कसं बोलावं हे कन्या राशीच्या लोकांकडून शिकावं. या लोकांकडे पार्टनरला दगा देण्याचं ठोस कारण नसतं. पण पार्टनरला दिलेला दगा लपवण्यासाठी त्यांच्याकडे शेकडो खोट्या गोष्टी असतात. या लोकांची प्रत्येक खोटी गोष्ट पार्टनरला खरी वाटत असते.  

तुळ राशी

या राशीच्या लोकांच्या स्वभावात स्थिरता कमी असते. जर या लोकांना काही अडचण वाटली तर ते त्या अडचणीला दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. प्रेमातही यांचं वागणं असंच असतं.  

वृश्चिक राशी

प्रेम तर आवश्यक आहेच. पण या राशीच्या लोकांचं लैंगिक जीवन परफेक्ट असणं गरजेचं असतं. आणि जेव्हा त्यांच्या पार्टनरकडून ते मिळत नाही, तेव्हा या राशीचे लोक यावर उपायही बाहेरच शोधतात. 

धनु राशी

या राशीचे लोक फारच मनमौजी असतात. प्रेमाच्या नात्यातही या लोकांची आनंदी राहणं, एन्जॉय करणं अशी इच्छा असते. पण जेव्हा यांचे पार्टनर यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक त्यांच्यापासून दूर जातात.  

मकर राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटतं की, आता या नात्यात काही राहिलं नाही. या नात्यात भविष्य नाही त्यावेळी हे लोक स्वत:हून खूप माघार घेतात. अशात त्यांना कुणी नवीन साथीदार भेटल्यास हे लोक आपल्या पार्टनरसोबतचं नातं तोडतात. 

कुंभ राशी

या राशीचे लोक फारच रोमॅंटिक असतात. पण पार्टनर केवळ यांनाच चिकटून राहिली तर यांना राग येतो. या लोकांना प्रेमातही फ्रिडम हवं असतं. जेव्हा त्यांना हे फ्रिडम मिळत नाही तेव्हा ते वेगळ पर्याय शोधायला लागतात. 

मीन राशी

रोमान्स आणि रोमान्स कायम टिकून रहावा याचे स्वप्न या राशीचे लोक सतत बघत असतात. पण जर पार्टनरने यांचे स्वप्न मोडले किंवा  त्यांच्या भावनांची गंमत केली तर हे पार्टनरपासून दूर जातात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट