शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

या राशी एकत्र आल्या की संसार होतो सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 15:49 IST

दोन व्यक्तींचा संसार सुखाचा होण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या राशी देखील अतिशय महत्वाच्या मानल्या जातात.

पूर्वीपासून भारतीय लग्न परंपरेत पत्रिका बघणे, सोळा गुण जुळवणे या गोष्टींना महत्व दिलं जातं. आज भलेही कितीही आपण कितीही आधुनिक झाले असं म्हणत असलो तरी आजही राशी, पत्रिका बघितल्या जातात. दोन व्यक्तींचा संसार सुखाचा होण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या राशी देखील अतिशय महत्वाच्या मानल्या जातात.

असं सांगितलं जातं की, ज्योतिष शास्त्रातील १२ राशींचा लव्ह लाईफवर बराच परिणाम होत असतो. प्रत्येकाच्या राशीनुसार त्याचा विशेष स्वभाव असतो. आणि त्या स्वभावाला योग्य स्वभावाचा किंवा राशीचा जोडीदार मिळाला तर त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुमंगल होतं. जर तुमच्या पार्टनरची राशी तुमच्या राशीसोबत जुळत असेल तर लव्ह लाईफ चांगली राहते, असेही बोलले जाते. 

1) मिथुन-तुळ

या राशींचे कपल एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल राहतात. मग ते फिजिकली असो वा मेंटली. या राशीच्या लोकांचा संसार अधिक सुखाचा होतो, असे बोलले जाते.

2) सिंह-तुळ

या दोन्ही राशीच्या लोकांना सोशली कनेक्ट राहायला आवडतं. त्यामुळे सोशल मीडिया हे यांच्यातील वादाचं कारण कधीच राहू शकत नाही. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये कायम सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहण्याची कायम इच्छा असते. त्यामुळे दोघांच्याही घरात या व्यक्ती लोकप्रिय असतात.

3) मेष - कुंभ

या दोन्ही राशीच्या लोकांना अॅडव्हेंचर करणं अतिशय आवडतं. त्यामुळे मेष आणि कुंभ राशीचे ट्रेकर्स एकत्र येण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे हे नेहमी एकमेकांसोबत राहणे पसंत करतात. आणि त्यामुळेच हे दोघे निसर्ग अधिकच एन्जॉय करतात.

4) वृषभ आणि वृष्चिक 

वृषभ आणि वृष्चिक या दोन्ही राशींमध्ये लीडरशिप संदर्भात कोणतेही मतभेद होत नाहीत. हे दोघे एकमेकांच्या निर्णयाचा सन्मान करतात. आणि हीच या दोन राशीची जमेची बाजू आहे.

5) वृषभ- कन्या

या दोन्ही राशीच्या लोकांसाठी घर, कुटुंब आणि स्थिरता महत्वाची असते. यामुळे यांच्यामध्ये जबरदस्त अंडरस्टॅण्डिंग राहते. एकमेकांना समजून घेण्याची पूर्ण तयारी असल्यामुळे हे लोक कायम एकत्रच राहतात.

6) धनु - सिंह

धनु राशीच्या लोकांना सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूप आवडतो आणि दोघेही एकमेकांना वेळोवेळी सपोर्ट करतात. त्यांचा आत्मविश्वासच त्यांच्या प्रेमाला अधिक खुलवत असतो. 77. कन्या आणि मकर हे लोक एकमेकांसाठी प्रामाणिक असतात. कधीही खोटं बोलत नाही. आणि हेच याची जमेची बाजू आहे. आणि हिच गोष्ट रिलेशनशिप नेहमी मजबूत राहते.

7) मिथुन - कुंभ

मिथुन आणि कुंभ या दोन्ही राशींमध्ये एकमेकांकडे खूप आकर्षित होतात. आणि आयुष्यातील चढ-उतारांचा एकरूप होऊन सामना करतात. कुंभ आणि सिंह या दोन्ही राशीच्या लोकांचे नाते उत्साहाने भरलेले राहते. जोडीदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप