‘एक ऐसे गगन के तले..’ ऐका केजरीवालांच्या आवाजातील गाणे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 20:08 IST
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गायक झालेत. होय, पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक गाणे गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
‘एक ऐसे गगन के तले..’ ऐका केजरीवालांच्या आवाजातील गाणे..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गायक झालेत. होय, पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक गाणे गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ केजरीवाल ‘दूर गगन की छांव में’ या चित्रपटातील गीत गात आहेत. अर्थात मूळ किशोर कुमार यांच्या आवाजातील या गाण्याचे बोल बदलण्यात आले आहेत. ‘एक ऐसे गगन के तले, जहां चोर भी ना हों, जहां भ्रष्ट भी ना हों, बस आप का राज चले..’ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत.यापूर्वी आप नेते कुमार विश्वास यांनी देखील ‘एक नशा’ हे गाणे गायले होते.