शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मुलांना होऊ द्या की मोठं स्वत:च, स्वत:हून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 4:09 PM

तरच वाढेल त्यांचा आत्मविश्वास..

ठळक मुद्देपरीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, अभ्यासक्रमाचा रट्टा मुलांकडून मारुन घेतलेला असतो म्हणून ती वाटतात हुशार...पण रट्टेमारु अभ्यासामुळे त्यांच्यात इतर गोष्टींबाबत कॉन्फिडन्स येईलच असं नाही.‘अभ्यासा’च्या नादात मुलांना इतर गोष्टींपासून ठेऊ नका दूर.

- मयूर पठाडेअनेक पालकांना आपल्या मुलांबाबत एका गोष्टीची मोठी चिंता वाटत असते. अभ्यासात तर खूप हुशार आहे, अभ्यासातलं त्याला काहीही विचारा, झटक्यात तो उत्तर देईल, घरातही तो अशिय शार्प आहे, पण बाहेर गेला, की त्याची पार ‘गोगलगाय’ होते. कोणाशीच धड बोलत नाही कि उत्तर देत नाही. घरात प्रत्येक बाबतीत ‘वाघ’ असलेलं आमचं मूल बाहेर कुठे चारचौघांत गेलं की त्याची ‘शेळी’ होते! अगदी नेहमीच्या परिचित लोकांकडे, नातेवाईकांकडे गेलं तरी त्याची बोलती एकदम बंद होते आणि ते लाजाळूचं झाड बनतं..अभ्यासकांनी याचं उत्तर शोधलं आहे. त्यांच्या मते मूल अभ्यासात हुशार आहे, कारण बºयाचदा तुम्ही त्याची घोकंपट्टी करुन घेतलेली असते. परीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, त्याच्या अभ्यासक्रमाचा रट्टा पालक म्हणून तुम्हीच त्याच्याकडून मारुन घेतलेला असतो, पण ज्या गोष्टींनी कॉन्फिडन्स येईल, मुलांचा आत्मविश्वास वाढेल, यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्या वाट्याला येऊच दिलेल्या नाहीत किंवा ‘अभ्यासा’च्या नादात ‘इतर’ गोष्टींसाठी त्याला वेळच मिळालेला नाही.या इतर गोष्टी म्हणजे काय?.. अभ्यासकांचं म्हणणं आहे, मुलांनी एकवेळ ‘अभ्यास’ केला नाही तरी चालेल. मुळात या वयातल्या मुलांवर अभ्यासाची सक्ती करायलाच नको. त्याऐवजी विविध गोष्टींची ओळख त्याला करुन द्यायला हवी. तीही अगदी सहजपणे. ‘अभ्यासाचं’ लेबल त्यामागे नको. अशा गोष्टी जर आपलं मूल करीत असेल, आपल्या बरोबरच्या मित्रांमध्ये वावरत असेल, त्यांच्याशी खेळत असतानाच, त्यांच्याशी भांडत असेल, काही वेळा कोणाला मारत असेल, तर काही वेळा मार खाऊन येत असेल.. पालक म्हणून तुम्हाला अशा वेळी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण मुलांची भांडणं आणि मारामाºयांमध्ये अगदीच गरज पडल्याशिवाय तुम्ही मधे पडू नका. मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीनं अतिशय उत्तम सोडवतात आणि पुन्हा लगेच एकत्रही येतात. एकोप्यानं खेळायलाही लागतात. मुलांचा आत्मविश्वास वाढतो तो याच गोष्टींतून. समाजात कसं वावरायचं, आपल्या क्षमता काय आहेत आणि त्या कशा पद्धतीनं वापरायच्या, तडजोड कुठे करायची, कुठे थांबायचं.. यासारख्या अनेक गोष्टी मुलं त्यातूनच शिकतात..त्यामुळे मुलांच्या फार मागे मागे न राहता, त्यांच्यावर ‘वॉच’ न ठेवता थोडं लक्ष असू द्या, पण मुलांना त्यांचं त्याचं मोठं होऊ द्या.. त्यामुळे ती खरंच मोठी होतील आणि तुम्हालाही मोठं करतील..