शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

जाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 17:27 IST

पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत.

प्रत्येक स्त्रीला एका महत्त्वाकांक्षी पुरुषाची आस असते, जो तिला समजून घेईल, तिच्यावर प्रेम करेल आणि त्याच वेळी तिची काळजी देखील घेईल. तर दुसरीकडे, पुरुषाला अशी स्त्री हवी असते, जी व्यवहारी, आत्मविश्वास असलेली आणि प्रगल्भ असेल. अनेक पुरुष त्यांच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी संबंध जुळवणे आणि ते निभावणे पसंत करू लागले आहेत. कारण, अशा स्त्रिया अधिक प्रगल्भ आणि जबाबदार व्यक्ती असतात, असे त्यांना वाटते. अशा नात्याचे एक उदाहरण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया या प्राइमटाइम मालिकेत बघायला मिळते आहे. ही रतन (रोहित सुचंती) आणि दीया (तेजस्वी प्रकाश) यांची एक अद्भुत, आजवर न पाहिलेली अशी कहाणी आहे. यात दीया रतनपेक्षा मोठी आहे. या मालिकेने पुरुष हा स्त्रीचा रक्षणकर्ता असतो या पारंपरिक विचारसरणीला शह दिला आहे आणि त्याच्या अगदी विपरीत कथानक मांडले आहे. पण अशा नात्यांचे स्वतःचे असे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. या मालिकेच्या निमित्ताने जाणून घेऊया पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे काही फायदे आणि तोटेपुरुषाने त्याच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे -वयाने अधिक असलेल्या स्त्रिया अधिक प्रगल्भ असतात. त्या अविचारी गोष्टींसाठी किरकिर करत नाहीत, त्याचे स्तोम माजवत नाहीत किंवा त्यात रसही घेत नाहीत. ज्ञान, कारकीर्द, आर्थिक व्यवस्थापन, निर्णय घेणे इत्यादी बाबतीत त्यांची समज अधिक चांगली असते आणि त्या अधिक अनुभवी असतात. वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या असतात आणि आपल्या पतीवर अवलंबून नसतात. उलट आर्थिक संकटात आपल्या पतीला मदतच करतात. वेळेचे व्यवस्थापन, इतरांना काम सोपविणे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात बारकाईने लक्ष घालणे ही कौशल्यं त्यांच्यात असतात.पुरुषाने त्याच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे तोटे -कुटुंब, समाज आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रीशी विवाह केल्याबद्दल सोसावी लागणारी अवहेलना. अशा नात्याचे आयुष्य त्यांच्या एकमेकांशी असलेल्या अनुरूपतेवर अवलंबून असते. हे नाते स्थिर ठेवण्यासाठी दोघांच्यात एखादा सामाईक दुवा शोधणे हे वाटते तितके सोपे नसते.त्याने तिच्या अपेक्षा पूर्ण न केल्यास ती निराश होऊ शकते.