प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणीतरी व्यक्ती असतो. ज्या व्यक्तीला छुप्या पध्दतीने तुम्ही पसंत करत असता, कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रत्येकाचा क्रश नक्कीच असतो. आपण नेहमी नकळतपणे त्या व्यक्तीचं निरीक्षण करणं, आपल्या कृतीतून त्याला काय वाटेल, किंवा ती व्यक्ती कशी राहते. तिचा स्वभाव या सगळ्या गोष्टींच गूपचूप निरिक्षण करत असतो.
अनेकदा आपल्याला ती आवडणारी व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते हे जाणून घेण्याची खूप उत्सूकता असतो. त्या व्यक्तीला काय आवडतं. याचा विचार जास्त केला जातो. तसंच आपला क्रश असलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लाईफमध्ये कोणी असेल का? याच सुध्दा विचार चक्र डोक्यात सुरू असतं. चला तर मग जाणून घेऊया आपल्या आवडत्या व्यक्तीशी संवाद न साधता अथवा त्या व्यक्तीला जाणीव होऊ न देता त्याचा मनातल कसं ओळखायचं.
जर तुम्हाला कोणतीही व्यक्ती आवडत असेल तर त्या व्यक्तीबद्द्ल जाणून घेण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करा. फेसबूक किंवा इन्स्टाग्राम अकाऊंटवर सर्च करून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवू शकता.
आवडत असलेल्या व्यक्तीच्या फ्रेंड्सची माहिती घ्या. त्यांचाशी हळूहळू बोलणं वाढवा. कारण या माध्यामातून तुम्हाला क्रशचा स्वभाव आणि कौंटुबिक जीवनाशी निगडीत गोष्टी समजण्यास मदत होईल.
जर कुठल्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल तर चॅट करताना ती व्यक्ती तुमच्या 'निक' नेमने तुमच्याशी बोलेल. त्यावेळी समोरचा व्यक्ती तुम्हाला मनापासून आपलं समजत असेल.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडत असाल तर ती व्यक्ती चॅट करतान इमोजीचा वापर अधिक करते. तुलनेने जेव्हा फॉर्मल चॅटिंग करत असाल तर इमोजीचा वापर जास्त होत नाही.
तुम्ही वॉट्स्एपचा डिपी कधी बदलता याबाबत त्या व्यक्तीला खूप उत्सूकता असते. तसंच ती व्यक्ती तुमच्या डिपी आणि स्टेटसवर कमेंटसुध्दा करत असते.