शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 14:44 IST

आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे.

आत्ताच्या जनरेशनमधील तरुण-तरुणींना लग्न करण्यात रस नाही, असं एक निरीक्षण आहे. घरातील लोकांनी मुलींसाठी मुलं पाहणं हा रिवाज गेली कित्येक वर्ष सुरु आहे. आत्ताही अशी लग्न होतात पण प्रमाण कमी झालंय. आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे. कारण आजूबाजूच्या लग्न झालेल्यांच्या विविध घटना पाहून ही जनरेशन  जरा लग्नापासून पळताना दिसते. पण तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये खालील गुण असतील तर तुम्ही त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता.

1) ऐकून घेणारा

बोलतात सगळेच. सगळ्यांनाच ओरडता येतं. पण असे फार कमी असतात जे चांगले ऐकून घेणारे असतात. हे फारच दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. अनेकदा अशी स्थिती येते की, तुम्हाला वाटत असतं की, तुमचं कुणीतरी ऐकावं. खासकरुन जेव्हा तुम्ही निराश असता. अशावेळी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डची मदत मिळत असेल, तो तुमची ही गरज भागवत असेल तर तुम्ही लकी आहात. जर त्याच्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटत असेल, तुमचा आत्मविश्वास वाढत असेल, तर तो व्यक्ती नक्कीच मॅरेज मटेरिअल आहे. 

2) तुम्हाला सपोर्ट करणारा आणि तुमचं यश एन्जॉय करणारा

मुलींसाठी हा बदलता काळ फारच वेगवेगळ्या दृष्टीने संघर्षांचा आहे. खासकरुन मध्यम वर्गीय मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जर अशात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तो तुमचं यश एन्जॉय करत असेल आणि तुमच्या आनंदात तो सहभागी होत असेल तर त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता. 

तुम्हाला या सवयी असतील तर तुमचं रिलेशनशिप आहे धोक्यात

3) त्याच्या यशात तुम्हाला स्थान देत असेल

फक्त सोबत फिरणं, पार्ट्या करणं हे न करता तो जर तुम्हाला त्याच्या यशात सहभागी करुन घेत असेल, त्या यशात तुमचाही वाटा सांगून तो तुम्हाला स्पेशल फिल करवत असेल, तर आणखी काय हवंय. तो तुमचा चांगला लाईफ पार्टनर होऊ शकतो.

4) इतरांशी कसा वागतो

तुम्हाला सोडून तुमचा बॉयफ्रेन्ड इतरांशी कसा वागतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मोठ्यांशी कसा वागतो, लहानांशी कसा वागतो, महिलांशी कसा वागतो हे महत्वाचं आहे. जर तो सारख्याच प्रेमाने सर्वांचा सन्मान करत असेल, त्यांचा आदर करत असेल तर तुम्ही त्याला लाईफ पार्टनर बनवण्याचा विचार करु शकता.

5) त्याच्या निर्णयात तुमचं मत

निर्णय लहान असो वा मोठा तो जर तुम्हाला त्याच्या निर्णयात सहभागी करुन घेत असेल, तुमच्याकडूनही त्यात सल्ला घेत असेल, तुमचं मत विचारत असेल तर ही फारच चांगली बाब आहे. असे गुण फारच कमी लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये जर हा गुण असेल तर त्याने तुमचं नातं आणखीन मजबूत होऊ शकतं. 

अशा पुरूषांवर जास्त फिदा होतात महिला !

6) तुमचा ऐकमेकांवर विश्वास आहे

विश्वास हा कोणत्याही यशस्वी नात्याचा मुख्य पाया आहे. विश्वास असेल तर प्रेम टिकतं, वाढतं. विश्वास नसेल तर प्रेम असूच शकत नाही. जर तुम्हा दोघांचाही ऐकमेकांवर विश्वास असेल तर तुम्हाला कुणीही वेगळं करु शकत नाही. 

7) राग मनात धरुन न ठेवणारा

वाद-विवाद, भांडण हे प्रत्येक नात्यात होत असतात. पण ही भांडणं, वाद, इगो विसरुन आपण पुन्हा नव्याने कशी सुरुवात करतो हे जास्त महत्वाचं असतं. भांडण जास्त न लांबवता समजूतदारपणा घेणे हा गुण फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो. 

मुळात कोणताही व्यक्ती 100 टक्के परफेक्ट नसतो. पण जेव्हा दोन वेगळे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना त्यांचं नातं परफेक्ट बनवायचं असतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपBeauty Tipsब्यूटी टिप्स