(image credit- peace for home parenting)
घरातल्या मोठ्या माणसांना आपल्या लग्नाबाबत खूप प्रश्न पडलेले असतात. एकदा शिक्षण पूर्ण झालं की आई बाबांना जराही धीर नसतो. आपल्या मुलीसाठी चांगल्यात चांगलं स्थळ कसं शोधता येईल याच्या प्रयत्नात असतात. अनेकदा घरातील मंडळी कमी आणि नातेवाईकांनाच आपल्या लग्नाची जास्त घाई झालेली असते. सर्वाधिक घाई मुलींच्या बाबतीत केली जाते. मग तुझा कोणी बॉयफ्रेन्ड आहे का? कोणी पाहिला आहेल का? मुलीने वेळेत लग्न केलेलं चांगलं असतं, असे कॉमन टीपीकल प्रश्न सुरू होतात.
तुम्हाला सुद्धा जर अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी लग्नाबद्दल विचारलं तर त्यांना योग्य उत्तरं देऊ शकता.अनेकदा नातेवाईक हे काहीही कारण नसताना प्रश्न विचारतात तर काही नातेवाईकांना उगाचच तुमच्या पर्सनल लाइफमध्ये नाक खूपसायची सवय असते. त्यामुळे त्यांचा हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे हे आधी समजून घ्या. त्यानंतर तुम्ही ठरवा की त्यावर उत्तर द्यायचं किंवा नाही. कारण काहीवेळा शांत राहणंच चांगल असतं.
जर तुम्ही उलट उत्तर दिलं तर अपमान केल्यासारखं सुद्धा वाटू शकतं. नातेवाईकांना उत्तर देण्याआधी तुमच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्यांना मनातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून निदान घरातील लोकं तरी तुम्हाला या बाबत बोलणार नाहीत. ( हे पण वाचा-रणवीर आणि दीपिकाचं नातं स्ट्रॉॅंग असण्याचं सिक्रेट! त्यांचा खास फंडा तुमच्याही येईल कामात...)
त्यांचं प्रश्न विचारण्यामागचं इन्टेन्शन जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटत असेल की, त्यांना उत्तर द्यायला हवं तर जे आहे ते खरं सांगा किंवा केवळ स्माईल देऊन उत्तर देणं टाळू शकता. जर ते केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रश्नांचा भडीमार करत असतील तर तुम्ही योग्य वेळ आल्यावर नक्कीच विचार करेन असं म्हणा. मी कधीही लग्न करेन, माझी इच्छा नाही. असं म्हणणं टाळा.
अनेक प्रयत्न करुनही समोरची व्यक्ती प्रश्न विचारणं थांबवत नसेल तर तुमच्या पर्सनल बाबींमध्ये लुडबूड करत असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नावर प्रति प्रश्न करु शकता. पण असं करताना समोरच्याला राग येऊ नये याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. ( हे पण वाचा-गर्लफ्रेंडला चुकूनही 'या' गोष्टी सांगाल तर ब्रेकअप झालंच म्हणून समजा!)