शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

 Happy Valentine's Day 2021 : पार्टनरसोबत संध्याकाळी व्हॅलेंटाईन डे  सेलिब्रेट करण्यासाठी ही आहेत परफेक्ट डेस्टिनेशन.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 09:38 IST

Happy Valentine's Day 2021 Celebration with partner : व्हॅलेंटाईन डे यावर्षी मस्त रविवारी आलाय तुम्ही आजच्या दिवशी तुमची कामं आटपून संध्याकाळीसुद्धा पार्टनरला भेटू शकता.

व्हॅलेनटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवसाची सगळेच कपल्स वाट बघत असतात. कारण इतर डेज साजरे करणं लोकांना शक्य नसतं. अशावेळी  व्हेलेंटाईन डे  (Valentine Day Date) ला तरी आपण पार्टनरला वेळ द्यायला हवा असं त्यांना वाटत असतं. कारण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा डे साजरा केला जातो.  व्हॅलेनटाईन वीकमधिल (Valentine week) इतर दिवस साजरे करायला आपल्याला वेळ मिळत नसतो. म्हणून व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी तरी आपण आपल्या पार्टनरसोबत असाव असं आपल्याला वाटत असतं.

व्हॅलेंटाईन डे यावर्षी मस्त रविवारी आलाय तुम्ही आजच्या दिवशी तुमची कामं आटपून संध्याकाळीसुद्धा पार्टनरला भेटू शकता. आज तुम्हाला मुंबईतील काही खास ठिकाणांबद्दल (valentine day Celebrations) सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी सहज जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाणं.

मरिन ड्राईव्ह

या ठिकाणी तुम्ही आपल्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. साऊथ मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशी जागा म्हणजे मरिन ड्राईव्ह. ही जागा  लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी अनेक हौसी फोटोग्राफर्स, डुडलर्स, डे ड्रिमर पाहायला मिळतात.  मरिन ड्राईव्हचा समुद्र किनारा आणि वातावरणाचा आनंद घेत तुम्ही व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता.

छोटा काश्मिर

आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष यामुळे हे उद्यान जिवंत दिसते.या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे. तुम्ही संध्याकाळी या ठिकाणी पार्टनरसोबत वेळ घालवू शकता.

गीरगाव चौपाटी

तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत इथून डोळ्याचे पारणे फेडणारा सूर्यास्त पाहू शकता. एकाबाजूला उंच उंच इमारती आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असं हे ठिकाणं. एका जागेवर बसून आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही इथे तासन् तास गप्पा मारू शकता.

जूहू चौपाटी 

मुंबईमध्ये जुहु चौपाटी हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. पर्यटकांद्वारे वारंवार जुहु चौपाटीला भेट दिली जाते. जुहु चौपाटीवर संध्याकाळी गर्दी असते कारण पर्यटक सहसा ताजी हवा आणि आनंदाने समुद्र किनाऱ्यावर चालण्यासाठी येतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घालवण्यासाठी जूहू चौपाटीला जाऊ शकता. Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

शिवाजी पार्क

शिवाजी पार्क माहित नाही अशी एकही व्यक्ती मुंबईत मिळणार नाही. अगदी खेळांपासून राजकारणापर्यंत साऱ्यांनीच या शिवाजी पार्कला गाजवलं आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी निवांत गप्पा मारत बसू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या घराजवळच्या किंवा भेटण्याच्या ठिकाणाजवळचं एखादं हॉटेल असेल त्या ठिकाणी गप्पा मारत खाण्यापिण्याचा आस्वाद  घेण्यासाठी जाऊ शकता. Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का?

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकrelationshipरिलेशनशिप