शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

व्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 10:07 IST

व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे. आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे. स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय.

फेब्रुवारी महिना म्हटले की सर्वांना आठवण येते ती व्हॅलेंटाईन डे ची! प्रेमी युगुल आपापल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात; कोणी कविता लिहितं तर कोणी प्रेमाची गाणी म्हणून आपल्या भावना व्यक्त करतं. आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे. स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय. आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे. ऑनलाईनच्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्याबद्दल घेतलेला हा आढावा....अनबॉक्स हर :या संकल्पनेतच सर्व काही दडलेलं आहे. स्टाईलक्रॅकरच्या या खास बॉक्समध्ये मुलींना आवडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, जसे कि क्लासी गॉगल्स, स्टायलिश टॉप वेयर, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज आणि एक छानसं ग्रीटिंग कार्ड! दर वेळी आपल्याला या सर्व गोष्टी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. पण स्टाईलक्रॅकरच्या या बॉक्स मध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या अनेक गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात... तर आपल्या प्रेयसीला एका रोमॅन्टिक डेटला घेऊन जाण्याआधी तिच्यासाठी हा प्रेमाचा बॉक्स हे एक परफेक्ट गिफ्ट असू शकतं.   ट्रेडिशनल कुर्तीज :लाल रंग हा प्रेमाचा रंग आहे आणि म्हणूनच ऑनलाईन बाजारात सध्या श्री कुर्ती ट्रेंड होत आहे. यासाठी वापरला जाणारा कपडा हा लिवा फॅब्रिक हे अत्यंत मऊ आणि हलके असल्यामुळे अशा फॅब्रिकच्या कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय लिवाचे कापड हे 100 टक्के नैसर्गिक पद्धतीचे असतात. हवामानाचा बदल लक्षात घेता या हलक्या आणि कम्फर्टेबल कुर्त्यांना प्राधान्य मिळताना दिसत आहे. ट्रेडिशनल कुर्त्यांवर हेवी एअर रिंग्स आणि सॉफ्ट मेकअप तुम्हाला एक स्पेशल लूक देतो. झोला बॅग्स :मुलींना सर्वात प्रिय असते तिची बॅग! आपली बॅग सर्वांपेक्षा हटके असावी हा प्रत्येक मुलीचा अट्टहास असतो. झोला बॅग्स या सध्या फॅशनमध्ये इन असल्यामुळे ज्या मुलांना त्यांच्या प्रेयसीला या व्हॅलेंटाईन डे ला खूश करायचे असेल त्यांनी ऑनलाईन शॉपिंग मध्ये झोला बॅग्सचा ऑप्शन खूप फायदेशीर ठरू शकतो.  स्टायलिश अटायर :आता सर्वानाच ट्रेंड नुसार आपला फॅशन स्टेटमेंट बदलवासा वाटतो. इंडो वेस्टर्न हा एक भन्नाट ऑप्शन सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. धोती पँट्स आणि खादी कुर्ता आणि त्यावर जंक ज्वेलरी असा क्लासी लूक मध्ये सध्याची तरुणाई वावरताना दिसत आहे. सध्या स्टाईल मध्ये इन असलेली फॅशन म्हणजे कलर डेनिम. स्पायकर इंडियाची कलर डेनिम ही आजच्या जनरेशनमध्ये सर्वांचा स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. मुलींना हा ऑप्शन देसी आणि वेस्टर्न लूकसाठी साजेसा आहे. कारण कलर डेनिम सोबत वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही स्टाईलमध्ये प्रयोग करू शकतो आणि हा लूक नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईन डेट साठी एक हटके पर्याय ठरू शकतो.लाँग ड्रेसेस :सध्या लाँग ड्रेसेसची क्रेझ सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसते. यामध्ये फ्लोरल प्रिंट, चेक्स, स्ट्रेट फिट असे अनेक ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध आहेत. तरुणींसाठी एखादा शॉर्ट ड्रेस हा पूर्णपणे वेस्टर्न असतो. मात्र फ्लोरल प्रिंटचा लाँग ड्रेस अशा ओकेजनला उत्तम दिसू शकतो. त्यावर साजेशी ज्वेलरी निवडल्यास या ड्रेसचा लूक अधिक खुलून येतो. ऑल टाइम बेस्ट साडी :साडी हा प्रत्येक मुलीचा वीक पॉईंट आहे. वेस्टर्न लुकसोबत सध्या साडीलाही तितकीच पसंती दिली जाते. ऑफिस, पार्टी किंवा कोणत्याही खास ओकेजनला साडी हा ऑप्शन मुलींसाठी नेहमीच एक वॅलिड ऑप्शन असतो. लिवा फॅब्रिक असलेल्या साड्या या ऑनलाईन मार्केटमध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत. लाल ,सफेद, हलका पिवळा, नियॉन ग्रीन, बेबी पिंक अशा फ्रेश कलरच्या साड्या बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरू शकतात. अशा प्रकारे आपल्या व्हॅलेंटाईन ला खूश करायचे असेल तर खिशाला परवडणारे हे सर्व ट्रेंडिंग ऑप्शन नक्कीच तुमचा प्रेमाचा दिवस आणखीनच स्पेशल करू शकतात.