शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

मुलांचं ‘क्रेडिट’ मुलांनाच देता, की त्यावर ‘हक्क’ सांगता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:25 IST

मुलांचा आत्मविश्वास नाहीतर वाढेल कसा?

ठळक मुद्देलहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलांमधला आत्मविश्वास वाढवते.मुलं जर त्यात यशस्वी झाली, तर त्याचं क्रेडिट मात्र त्यांचं त्यांनाच दिलं जायला हवं.

- मयूर पठाडेमुलं कधीच कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, अशी अनेक पालकांची नेहेमीची तक्रार असते. त्यासाठी ते मुलांना कायम दुषणंही देत असतात. ‘इतक्या वेळा तुला सांगावं लागतं, पण आजपर्यंत तू ऐकलं असेल तर शपथ..’ असे बोल कायम ते त्याला ऐकवतही असतात. अर्थातच ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. मूल एकही जबाबदारी घेत नाही, असं नसतं. बºयाचदा जबाबदारी टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो, हे खरं असलं तरी जेव्हा जेव्हा आपली मुलं जबाबदारी घेतात, घेऊ पाहातात, तेव्हा त्यांना आपण किती उत्तेजन देतो, त्यांच्या त्या कृतीचं कितीवेळा कौतुक करतो हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारायला हवा.मुलं जबाबदार व्हावीत यासाठी काय कराल?मुळात जबाबदारी ही एका रात्रीतून येत नाही आणि जादूची छडी फिरवल्यासारखं अचानक कोणी जबाबदार बनतही नाही. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.अर्थातच मुलाचं वय काय आहे, त्यानुसारच आणि त्याला झेपणारी अशीच जबाबदारी त्याच्यावर टाकायला हवी. त्यात तो चुकला तरी त्याच्यावर न ओरडता त्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलं जसजशी मोठी होत जातील, तसतशी त्यांच्या खूपच उपयोगी पडेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.एकदा का जबाबदारी घेण्याची सवय लागली की मग त्याचं उत्तरदायीत्वही त्यांना दिलं पाहिजे. एखादी जबाबदारी त्यांनी योग्य रीतीनं पार पाडली, तर त्याचं सारं क्रेडिट मुलांनाच जायला हवं. त्याचं क्रेडिट जर पालकांनी घ्यायचा प्रयत्न केला, ‘बघ, मी सांगितलं, त्याचा फायदा झाला की नाही, असंच माझं ऐकत जा..’ असं कधी आडून, कधी प्रत्यक्ष जर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न पालकांनी केला, तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.जबाबदारी घेतल्यानंतर त्याचा परिणाम जर चुकीचा झाला, तर मुलांना आणखी संधी दिली पाहिजे. ‘तुला काहीच कळत नाही, सांगितलं होतं ना, नको करूस म्हणून..’ असं केलं तर जबाबदारी घेण्यापासून मुलं लांबच राहतील आणि मोठेपणीही कोणताही निर्णय घेण्यापासून ते घाबरतील.जबाबदारी घेण्याचं योग्य ते स्पष्टीकरण देतानाच त्यांना सारखे उपदेशाचे डोस न पाजता, योग्यतेचं भान आपणही पाळलं तरी मुलं नक्कीच एकामागे एक जबाबदाºया स्वीकारतात. चुकांतून शिकतात आणि झटपट पुढे जातात. नैराश्यापासून कायम लांब राहातात..