शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

एकतर्फी प्रेमात चुकूनही करू नका या चुका, पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 15:33 IST

अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात.

२०१७ मध्ये आलेल्या रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात एक डायलॉग होती की, 'एक तरफा प्‍यार की ताकत ही कुछ और होती है. औरों की तरह ये दो लोगों में नहीं बटती, सिर्फ मेरा हक है इस पर...हा डायलॉग फारच हिट झाला होता. खासकरून प्रेम करणाऱ्यांमध्ये हा डायलॉग जास्तच हिट झाला होता. या डायलॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकतर्फी प्रेमाबाबत. आजची तरूणाई या एकतर्फी प्रेमाच्या कचाट्यात अडकत आहे. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. एकतर्फी प्रेमामुळे कधीही खालील चुका करू नये.  

तणावाला दूर ठेवा

तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्या काहीच गुन्हा नाहीये. पण तुमच्या प्रेमाचा नकारात्मक प्रभाव तुमच्या अभ्यासावर किंवा करिअऱवर पडू शकतो. त्यासोबतच तुम्ही तणावात येऊ शकता. याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो. नकार ऐकल्यानंतरही तुमच्या जीवनात मिळवण्यासाठी खूपकाही असतं.  

दुर्लक्ष करा

जे काही झालं त्यात कुणाची चुकी, कुणाचा दोष या सगळ्यांचा विचार करत बसू नका. प्रेमाला सहजासहजी विसरता येत नाही हे जरी सत्य असलं तरी त्यात अडकून पडू नका. त्या गोष्टींवर दुर्लक्ष करण्यासाठी स्वत:ला दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त करून घ्या. 

चुकीचे पाऊल उचलू नका

कुणाच्याही भडकावल्याने काहीही चुकीचं करू नका. याने तुम्हाला काहीही मिळणार नाही. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्याला इजा पोहचवण्याचाही विचार चुकीचा आहे. याने तुम्हाला तुमचं प्रेम मिळणार नाही. 

नशेचा आधार घेऊ नका

खऱ्या आयुष्यात सिनेमातील काल्पनिक गोष्टी वापरू नका. या काल्पनिक गोष्टींचा खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. दु:खं दूर करण्याच्या नावाखाली नशेचा आधार घेऊ नका. याने तुमचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट