शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

भारतात इंटरनेटवर लाइफ पार्टनर शोधण्याऐवजी डेटिंग पार्टनर शोधण्यात कमालीची वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 11:11 IST

जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलच्या एक रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधण्यापेक्षा डेटिंग साइट्सवर पार्टनर शोधणं भारतीय लोक जास्त पसंत करत आहेत.

(Image Credit : More)

जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलच्या एक रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधण्यापेक्षा डेटिंग साइट्सवर पार्टनर शोधणं भारतीय लोक जास्त पसंत करत आहेत. 'इअर इन सर्च-इंडिया - इनसाइट्स फॉर ब्रॅड्स' हा गुगलचा रिपोर्ट समोर आला आहे. यातून समोर आलं की, इंटरनेटच्या माध्यमातून डेटिंग पार्टनर शोधणं ४० टक्क्यांनी वाढलं आहे. तर मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून इंटरनेटवर लग्नासाठी व्यक्ती शोधण्यात केवळ १३ टक्के इतकीच वाढ झाली आहे.  

लोक काय म्हणाले सर्व्हेत?

(Image Credit : DXSCOM)

आताही डिजिटल विश्वात डेटिंग पार्टनर शोधण्याच्या तुलनेत लग्नासाठी व्यक्ती शोधणं तीन पटीने वाढलं आहे. पण ज्या प्रकारे भारतीय यूजर्समध्ये डेटिंगची क्रेझ वाढत आहे, ती बघून असं वाटतं की, काही वर्षांमध्ये हा ट्रेंड लाइफ पार्टनर शोधण्याच्या ट्रेंडला मागे टाकेल. गुगलचं हे निरीक्षण भारत मॅट्रिमनी साइटच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चचं समर्थन करतं. ज्यात म्हटलं गेले होतं की, एक सामान्य भारतीय हळूहळू फार भावूक होत चालला आहे. या सर्व्हेत सहभागी ६ हजार भारतीयांपैकी ९२ टक्के लोकांचं म्हणणं होतं की, ते प्रेमाच्या शोधात आहेत. 

प्रेम व्यक्त करण्यासाठी 'हे' करतात लोक

(Image Credit : Diabetes UK)

या सर्व्हेमधून ही बाब समोर आली की, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी २४ टक्के भारतीय शब्दांचा वापर करतात, २१ टक्के भारतीय रोमॅंटिक डिनरच्या माध्यमातून व्यक्त करतात, ३४ टक्के लोक गिफ्ट्स देऊन तर १५ टक्के लोक रोमॅंटिक हॉलिडे प्लॅनिंग करून आपल्या पार्टनरप्रति प्रेम व्यक्त करतात. एक आणखी आश्चर्यकारक बाब यातून समोर आली की, केवळ डेटिंग कपल्सच व्हॅलेंटाइन डे साजरा करत नाही तर सर्व्हेत सहभागी ८६ लोकांचं म्हणणं होतं की, त्यांना लग्नानंतरही व्हॅलेंटाइन डे साजरा करायचा आहे.

फूड डिलिव्हरी काय नंबर १

केवळ प्रेमच नाही तर भारतीयांना बाहेरच्या खाण्याचीही आवड आहे. हे २०१८ मध्ये फूडसंबंधी सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली यावरून दिसून येतं. या रिसर्चमधून आढळलं की, स्विगी, झोमॅटो आणि दुसरे फूड डिलिव्हरी ब्रॅन्ड्स वेगाने पुढे जात आहेत. ऑनलाइन फूडमध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या पदार्थात पिझ्झा हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. 

टॅग्स :marriageलग्नRelationship Tipsरिलेशनशिप