शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सावधान: मुलांसमोर भांडताय? मग मुलांना गमावून बसाल!

By admin | Updated: May 10, 2017 18:07 IST

मुलांसमोर कचाकचा भांडणाऱ्या पालकांच्या मुलांच्या मनावर होतात गंभीर दुष्परिणाम

-डॉ. अनिल मोकाशीआई वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. मुलांना असुरिक्षत वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडिलांच्या भांडणात मुलं काळजीने घेरली जातात. घाबरतात. भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्यामुळेच भांडणं होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधानकाळ (कॉन्संट्रेशन) कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उद्धटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्र मकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानिसक समस्या येऊ लागतात.मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी, त्यात कौटुंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडताना स्वत:वर मर्यादा घालून घ्यायला हव्यात. त्या पाळायला हव्या.

भांडण होतेय असे वाटले तर काय करावे?शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा. राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी. मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे. माफी मागायला व माफ करायला शिकावे. सहसंमतीने मधूनच पाणी, चहा इतर गोष्टींसाठी भांडण विश्रांती घ्यावी. ब्रेक घ्यावा. भांडताना काय करू नये?मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको. शिविगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उद्धार नको. निघून जाऊ नये. त्याने प्रश्न सुटत नाही. किंचाळून, खेकसून बोलणे नको. जाहीर भांडण नको. मुलांना भांडणात ओढायला नको. फक्त वयस्कांचे, लैंगिक, पैसे, सासुरवाडी असे विषय मुलांसमोर नको. जुन्या चुका, जुने मुद्दे उकरून उकरून भांङण नको.भांडण होतेच पण..थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचा एक भाग असतो. अगदी बंद दाराआड, कुजबुजत भाडांयची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलूंन वाट मोकळी करु न देणं आवश्यक असते. कुटुंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्यात. रागाच्या भरात बोललेले सगळेच खरे नसते हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात. हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडिलांना भांडताना बघितल्यावर जुळवून घेतानांही बघायला हवे. त्यातून ते जीवनात तडजोड किती आवश्यक आहे, जूळवून कसे घ्यावे हे शिकतील.पण भांडणं वारंवार व जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होऊ लागली, तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधाऱ्या व्यक्तीचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटुंबाचं हित आहे. भांडणाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेले व्यसन, जुगार, पावित्र्याबद्द्ल शंका असे प्रश्न समुपदेनातुन उघड होतात. त्यांचे निवारण करता येते.म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा, पण जरा जपून, तुमची मुले बघताहेत, ऐकताहेत, तेच शिकताहेत.( लेखक बारामतीस्थित सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत.) dranilmokashi@gmail.com