शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Valentine Day : बॉयफ्रेंडला काय गिफ्ट द्यावं विचार करताय? 'हे' ऑप्शन्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 14:44 IST

व्हॅलेंटाइन वीक सध्या सुरू असून व्हॅलेंटाइन डे साठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल आणि त्या व्यक्तीला ती तुमच्यासाठी किती खास आहे, हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असाल तर, तुम्ही त्यांना एखादं खास गिफ्ट देऊ शकता.

व्हॅलेंटाइन वीक सध्या सुरू असून व्हॅलेंटाइन डे साठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल आणि त्या व्यक्तीला ती तुमच्यासाठी किती खास आहे, हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असाल तर, तुम्ही त्यांना एखादं खास गिफ्ट देऊ शकता. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला गिफ्ट सिलेक्ट करण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. तुम्हाला आम्ही काही खास गिफ्ट्सच्या ऑप्शनबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खास गिफ्ट निवडू शकता. 

हिडन मेसेज टाय

तुम्ही तुमच्या मि. परफेक्टसाठी या व्हॅलेंटाइन डेसाठी एक टाय गिफ्ट करू शकता. परंतु, ही टाय इतर टायप्रमाणे सिम्पल असू नये. सध्या बाजारामध्ये एक खास टाय उपलब्ध आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुम्ही ही टाय तुमच्या पार्टनरला गिफ्ट करू शकता. ही टाय तुम्हाला ऑनलाइन साइट्सवरही उपलब्ध होईल. आता तुम्ही विचारात पडला असाल की, या टायमध्ये असं काय खास आहे? तर या टायच्या मागील बाजूस एक छोटसं पॉकेट आहे. त्यामध्ये तुम्ही तुमची लव्ह नोट लिहून त्यामध्ये ठेवू शकता. लव नोट्स लिहिण्यासाठी तुम्हाला टायसोबतच पेपेर हार्ट्सही मिळतील. त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना लिहू शकता. 

हाफ हार्ट स्क्वायर रेड मग सेट

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरला एक सुंदर कॉफी मग गिफ्ट करू शकता. तुम्हाला मार्केटसोबतच ऑनलाइनही हा मग सेट सहज उपलब्ध होईल. या सेटमध्ये हार्ट शेप असणारा रेड मग , सुंदर कोट असणारे मग यांचा समावेश होतो. तुम्ही या सर्व मगमधून तुमच्या आवडीचा एखादा मग निवडून तुमच्या पार्टनरला सरप्राइज देऊ शकता. 

लेदर वॉलेट 

अनेक पुरूषांकडे वॉलेट असतचं आणि काही लोकांना तर सुंदर, क्लासी आणि स्टायलिश वॉलेट्स ठेवण्याचा शौक असतो. जर तुमच्या पार्टनर्सलाही वॉलेट्सचा शौक असेल तर तुम्ही या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पार्टनरला लेदर वॉलेट गिफ्ट करू शकता. बाजारामध्ये आणि अनेक ऑनलाइन साइट्सवर वेगवेगळ्या डिझाइन्सचे लेदर वॉलेट्स अवेलेबल आहेत. 

लेदर ऑफिस बॅग

ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी बॅग फार इम्पॉर्टंट असते. तुमचा पार्टनरही ऑफिस गोइंग असेल तर त्यांच्यासाठी हे गिफ्च परफेक्ट आहे. लेदर बॅग अत्यंत प्रोफेशनल लूक देते. तुम्ही ब्लॅक, ब्राउन किंवा इतर कलर्सच्या लेदर बॅग्जपैकी एखादी बॅग गिफ्ट करू शकता. अशा फॉर्मल बॅग्जसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. 

स्टाइलिश रिस्ट वॉच 

घड्याळ सर्वांच्या लाइफमध्ये एक महत्त्वाचे काम करते. कारण सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही एक मिनटंही कुठे वाया घालवू शकत नाही. त्यामुळे या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला घड्याळ गिफ्ट करू शकता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचं घड्याळ घेऊ शकता. 

स्टायलिश फोटो फ्रेम

तुमच्या प्रेमाची आठवण म्हणून तुम्ही तुमच्या दोघांचा एखादा फोटो पार्टनरला फ्रेम करून देऊ शकता. त्यामुळे तुमच्या काही आठवणींना उजाळा मिळण्यासही मदत होईल.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल