शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

​अबब! एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ५० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 20:33 IST

तीस ते सत्तर लाख (३-७ मिलियन) इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणाऱ्या स्टार्सना कंपन्या एका पोस्टसाठी ७५ हजार डॉलर्सपर्यंत (५० लाख रु.) रक्कम देतात.

सोशल मीडियाच्या आगमनाने माहिती व तंत्रज्ञानाचे जग पूर्णपणे ढवळून निघाले आहे. पारंपरिक व्यावसायिक चौकटी कोलमडून नवे, अधिक सृजनशील आणि आक्रमक बिझनेस मॉडेल्स तयार झालेत. जाहिरातदारांसाठी तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे नंदनवनच. आपल्या टार्गेट ग्राहकांपर्यंत उत्पादन घेऊन जाण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून अनेक कंपन्या फेसबुक-इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया वेबसाईटस्चा खुबीने वापर करत आहेत.सध्या सोशल मीडियावर जाहिरातीचा नवा फंडा म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रेटींना प्रोडक्टस्बद्दल पोस्ट करायला लावणे. फेमस स्टार्स, मॉडेल्स, खेळाडूंचे लाखो-कोट्यवधी फॉलोवर्स असतात. त्यांनी जर एखाद्या उत्पादनाबद्दल पोस्ट केले म्हणजे ते लाखो लोकांपर्यंत पोहचणार. म्हणजे ‘बझ’ निर्माण होणार.‘कॅप्टिव्ह-८’ कंपनीने दिल्या माहितीनुसार, तीस ते सत्तर लाख (३-७ मिलियन) इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणाऱ्या स्टार्सना कंपन्या एका पोस्टसाठी ७५ हजार डॉलर्सपर्यंत (५० लाख रु.) रक्कम देतात. तसेच ५० हजार ते पाच लाख फॉलोवर्स असणारे इन्स्टाग्राम यूजर्सदेखील एका जाहिरात पोस्टसाठी एक हजार डॉलर्सपर्यंत (६७ हजार रु.) कमवू शकतात.अशा प्रकारे वाढणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण पाहता इन्स्टाग्रामने आता या यूजर्सना ‘#अ‍ॅड’ किंवा ‘#स्पॉन्सर्ड’ असे हॅशटॅग वापरणे बंधनकारक केले आहे. कायली जेनर, किम कार्दाशियन यांना आपल्या अनेक पोस्टना कंपनीच्या अशा धोरणामुळे हे हॅशटॅग जोडावे लागले.