शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी ५ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 14:32 IST

तुमच्यासोबतही असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये. कारण रुसलेल्या गर्लफ्रेंडला पटविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

नात्यांमध्ये  छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असतातच, मग ते नातं नवरा-बायकोचं असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमधील असो. पण, ब-याचदा आपल्या जोडीदारात आणि आपल्यात इतका वाद होतो की मग नात्यामध्ये दरी निर्माण होण्यास सुरूवात होते. एकमेकांमध्ये भांडण झाल्यानंतर मग रुसवा-फुगवा सुरु होतो. भांडणानंतर रागावलेल्या बायको किंवा गर्लफ्रेंडला पुन्हा पटविण्यासाठी मग त्यांच्या जोडीदाराला करावी लागते तारेवरची कसरत. तुमच्यासोबतही असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये. कारण रुसलेल्या गर्लफ्रेंडला पटविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

१)  तुमची गर्लफ्रेंड आणि तुमच्यात ज्या कुठल्या कारणावरुन वाद झाला आहे त्या विषयावर शांतपणे बसून चर्चा करा. दोघांनीही एकमेकांचं संपूर्ण म्हणणं ऐकूण घ्या. दोघांनीही एकमेकांचं बोलणं ऐकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की, यामध्ये तुमची खरोखरचं चूक आहे तर कुठल्याही प्रकारची लाज किंवा कमीपणा न वाटून घेता गर्लफ्रेंडला सॉरी म्हणा. खरे बोलण्याने कुणाचंही नुकसान होत नाही आणि खरं बोलणं हे नेहमी चांगले असते.

२)  दोघांमध्ये एखाद्या विषयावर चर्चा होत असताना लक्षात ठेवावं की, कुठल्याही प्रकारचा वाद होवू नये. कुठल्याही गोष्टीवर वाद होणं हे नेहमीच नुकसानदायक असतं. तसेच चुकी मान्य करणं म्हणजे सर्वकाही संपलं असे होत नाही. तर, तुमच्या जोडीदाराला या गोष्टीची जाणीव करुन द्या की, तुम्ही केलेल्या कृत्याचा खरचं तुम्हाला पश्चाताप होत आहे. 

३)  तुमच्या गर्लफ्रेंडला जाणीव करुन द्या की, ती तुमच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती आहे. तसेच तुम्ही हे नातं आयुष्यभर प्रेमाने आणि प्रामाणिकपणे जगणार आहात. गर्लफ्रेंडचा हात पकडून या गोष्टी बोलणं खुपच प्रभावशाली ठरेल.

४)  बोलता-बोलता अशा काही गोष्टी बोला की, ज्यामुळे तुमची गर्लफ्रेंड सर्व राग विसरुन जाईल आणि हसण्यास सुरुवात करेल. तुमची मस्करी करण्याची सवय किंवा जोक्स सांगण्याची सवय गर्लफ्रेंडचा राग शांत करु शकते.

५)  अशा गोष्टी बोलणं टाळा की ज्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला वाईट वाटेल. तसेच एखाद्या दिवशी डिनरचा प्लॅन बनवून तिला सरप्राइजही देऊ शकता. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट