शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये कोणत्या राशीचं लव्हलाईफ कसं असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:49 IST

नविन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसच राहीले आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण उत्सूक आहे कि त्यांना हे वर्ष कसं जाईल.

नविन वर्ष सुरू होण्यासाठी  काही दिवसच राहीले आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण उत्सूक आहे कि त्यांना हे वर्ष कसं जाईल. या सगळ्या प्रश्नांपैकीच एक म्हणजे जे लोक सिंगल आहेत त्यांना आपल्याला पार्टनर कसा मिळणार हा प्रश्न सतावत आहे.  या नविन वर्षात पार्टनर मिळणार कि नाही तसंच जर मिळाला तर तो कसा असेल असा प्रश्न पडत असेल तर आज तुम्हाला १२ राशीच्या नवीन वर्षातील जीवनाबद्दल सांगणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कळेल की येणारया वर्षात तुमचं लव्ह लाईफ कसं असेल. चला तर मग जाणून घेऊया  या राशींबद्दल . 

मेष

मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुरूवातीचे काही महिने प्रेम आणि आनंदात जाणार आहेत. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही या कालावधीत तुमच्या पार्टनरला  प्रपोज सुध्दा करु  शकता. म्हणजेच जे सिंगल आहेत त्यांना पार्टनर नक्कीच मिळू शकतो. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांचे प्रेम जीवन अगदी सामान्य असेल. जर नात्यांमध्ये अहंकाराची भावना असेल तर नातं कमकुवत होऊ शकतं. यासाठी पार्टनरसोबत राहणं गरजेचं आहे. त्यामुळ जर राग आला असेल तर संयम बाळगा.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे नवीनपुर्ण प्रेम आणि रोमांस यांनी बहरलेले असेल. तुमचा पार्टनर तुमच्या चुकांना माफ सुध्दा करेल. तसंच ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच लग्न होण्याची शक्यता आहे. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांना या वर्षात भरपूर  प्रेम मिळणार आहे. तसंच लहान- मोठ्या तक्रारी तसंच भांडण ही नात्यांमध्ये होत राहतील. परंतू तुमच्या पार्टनरचे तुमच्यावरचे प्रेम कमी होणार नाही. अनेक सिन्गल लोकांची लग्न  होण्याची  शक्यता आहे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी  एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर पासून जरा चार लांब राहिलेलं योग्य ठरेल कारण त्यामुळे  तुमची बदनामी होऊ शकते. 

सिंह

सिंह राशीचे व्यक्ती हे या वर्षात आपल्या पार्टनरला  कमी वेळ देणार आहेत. त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं सावधगिरीने वागा.

कन्या

कन्या  राशीच्या लोकांना त्यांचा पार्टनर भरपूर साथ देणार आहे.  तुम्हाला या वर्षी पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा योग येणार आहे.  तसंच लग्न करण्याचा विचार सुद्दा तुम्ही या वर्षी करु शकता.

तुळ

तुमच्या प्रेमाने भरलेल्या नात्याला वाचवण्यासाठी जास्त चिडचिड करणं थांबवायला हवं. अन्यथा नात तुटण्याची शक्यता असते.  जर तुमचा लग्न करायचा विचार असेल तर मे महिना ते सप्टेंबर पर्यंत  तुम्ही लग्न करू शकता. 

वृश्चिक

या राशीच्या  लोकांच्या जीवनात अनेक चढउतार घेण्याची शक्यता आहे. उगाच शुल्लक कारणावरून आपल्या पार्टनरवर  संशय घेऊ नका. नाहीतर  नातं तुटू शकतं. 

धनु

हे नविन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी प्रेमाने भरलेलं असेल. नात्यांमध्ये लहानं मोठे चढ-उतार येतील पण त्याचा परीणाम तुमच्या नात्यावर  होणार नाही. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हे त्यांचे पार्टनरसोबतचे संबंध अजून  चांगले राहतील. जर तुम्ही  लव्ह मॅरेज करायचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनात या वर्षी अनेक कठिण प्रसंग येतील. तुमच्या पार्टनरला तुमच्या सवयी खटकू शकतात. ज्या गोष्टी करणं पार्टनरला आवडत नाही त्या टाळण्याचा प्रयत्न करणं फायदेशीर ठरेल.

मीन

२०२० मध्ये मीन राशीच्या  लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. जर तुमच्याशी कोणाचं भाडणं झालं असेल तर ते पहिल्याच महिन्यात दूर होईल. कामाच्या व्यापात तुम्ही तुमच्या पार्टनरला पुरेपूर वेळ देऊ शकणार नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप