शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगार कार्यालयाकडे युवतींची पाठच!

By admin | Updated: January 4, 2015 01:04 IST

अल्प प्रतिसाद : ४२ वर्षात केवळ ११०४१ जणींनी घेतला लाभ

शोभना कांबळे / रत्नागिरीजिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३३,८७७ बेरोजगारांनी नावनोंदणी केली. त्यापैकी २२८३६ युवक असून, केवळ ११,०४१ युवतींनी नावे नोंदविली आहेत. यावरून मुली स्वयंरोजगारासाठी नावनोंदणी करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.येथील जिल्हा सेवायोजन कार्यालयाची (आताचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र) निर्मिती १९६९ साली झाली. त्यानंतर १९९४ साली या कार्यालयाचे नामकरण ‘जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र’ असे झाले. मात्र, या ४३ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील युवकांची संख्या २२,८३६ इतकी असून, युवतींची संख्या निम्म्याने कमी म्हणजे ११,०४१ इतकी आहे. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागातील युवक - युवतींची संख्या अधिक आहे. एकूण संख्येपैकी १८,८२४ ग्रामीण युवकांनी तर ८,१३९ ग्रामीण युवतींनी या कार्यालयाकडे नोद केली आहे. म्हणजेच आतापर्यंत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये नावनोंदणीबाबत उदासीनता दिसून येत आहे. तसेच मुली आपल्या शहराबाहेर काम करण्यास इच्छुक नसल्याने त्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे स्वयंरोजगारासाठी दहावी ते विविध विषयातील पदव्युत्तर युवक - युवती रोजगार मिळावा, या हेतूने नाव नोंदणी करतात.आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी पदधीधरांनी केली आहे. त्याखालोखाल दहावी उत्तीर्ण झालेल्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, पदव्युत्तर झालेल्यांपैकी केवळ २९ जणांनीच कार्यालयाच्या नोंदणीचा लाभ घेतला आहे. या दोन्हींमध्ये विधी शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर झालेल्या एकाही उमेदवाराने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे स्वयंरोजगार केंद्राकडे नोंदणीबाबत अनेकांची अनुत्सुकता असल्याचे दिसून येते.