शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

योग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:59 IST

आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देयोग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रियारत्नागिरीतील नागरिकांनी दर्शविला उत्तम सहभाग

रत्नागिरी : आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.येथील माळनाका भागातील विवेक हॉटेलच्या भागिरथी सभागृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्ममाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात रत्नागिरीतील नागरिकांनी उत्तम सहभाग दर्शविला.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मैदान, विवेक हॉटेल हॉल, माळनाका, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पत्नी कांचन चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. बामणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, पतजंली योग समिती, राज्य कार्यकारणीच्या सदस्या रमा जोग, पंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष अ‍ॅड. विद्यानंद जोग, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, आपण धकाधकीच्या जीवनामध्ये काम करीत असताना वेगवेगळया जीवनशैली जगत असतो. हे सर्व करीत असताना आपलं मन आणि शरीर एकत्र ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असतं. योग हा काही व्यायाम नसून तर तो स्वत: मधील क्षमता ओळखण्यांची प्रक्रिया, असे आपल्याला वाटते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यामधील क्षमता जागृत करु आणि नियमित योगा करुन आरोग्यसंपन्न राहू या, असे ते म्हणाले.यावेळी शहरातील रा. भा. शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी योग गीत सादर केले. राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे हिनेही यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली.

टॅग्स :YogaयोगRatnagiriरत्नागिरी