शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नव्या फॅसिझमविरुध्द साहित्यिकांनी वैचारिक लढा उभारावा : डॉ.भालचंद्र मुणगेकर

By मेहरून नाकाडे | Updated: December 2, 2023 17:44 IST

गोपाळबाबा वलंगणकर साहित्यनगरी ( रत्नागिरी ) : ‘हिंदू राष्ट्र’ हा भारतातील ‘नव्या फॅसिझम’चा आविष्कार आहे. नव्या फॅसिझम हे लाेकशाहीला घातक असून, ...

गोपाळबाबा वलंगणकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : ‘हिंदू राष्ट्र’ हा भारतातील ‘नव्या फॅसिझम’चा आविष्कार आहे. नव्या फॅसिझम हे लाेकशाहीला घातक असून, धर्माच्या नावाने ताे रुजताे आहे. लाेकशाही बळकट करायची असेल, तर साहित्यिकांनी वैचारिक लढा उभारला पाहिजे. नव्या फॅसिझमविरुद्धच्या वैचारिकतेत साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर शनिवारी येथे केली.प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि एस.पी. हेगशेट्ये काॅलेज ऑफ आर्ट्स, काॅमर्स ॲण्ड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे रत्नागिरीत आयाेजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष जी.के. ऐनापुरे, स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, नवनिर्माण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, डाॅ.अलिमियाॅ परकार, युयुत्सू आर्ते, नवनिर्माण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर, महाविद्यालयाच्या प्राचार्या आशा जगदाळे उपस्थित होते.या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अम्बुज यांच्या हस्ते करण्यात आले. डाॅ.मुणगेकर पुढे म्हणाले की, भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय, मैत्री, करुणा या मूल्यांवर आधारित जाती, वर्ग, लिंग, भेदविरहित, शाेषणमुक्त, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक भारत निर्माण करायचा आहे. त्या सर्वांनी या नवफॅसिझमविरुद्ध वैचारिक भूमिका घेऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकर