शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काळजी, भीती अन् आपुलकी - मुंबईकरांचे स्वागत; माणसातील कटुता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:14 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये ...

ठळक मुद्देमुंबईकरही गावात स्थिरावले

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये भीतीचे काहूर माजले आहे. तरीदेखील गावी येणाऱ्यांचे लोंढे थांबत नसल्याने गावी आलेल्यांची आपुलकीने व्यवस्थाही केली जात आहे. कोरोनामुळे मुंबईकर आणि गावकरी यांच्यात दुरावलेले नातेसंबंध आता सुरळीत होण्यास मदत झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नागरिक नोकरी, धंद्यानिमित्त मुंबई, पुण्यात कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून स्वत:सह कुटुंबाच्या काळजीने मिळेल त्या वाहनाने, वेळेप्रसंगी चालत अनेकांनी गावाची वाट धरली. त्यामुळे गावाकडे येणाऱ्यांचे लोंढे वाढले. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार १७२ नागरिक दाखल झाले आहेत. अजूनही अनेकजण येत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने त्यांच्यासाठी शाळा, समाज मंदिर, गावातील रिकामी घरांची व्यवस्था केली. गावात येणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण वाढल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरूवातीला विरोधाचे सूर उमटू लागले. भीतीमुळे गावाच्या सीमा बंद झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी मुंबईकरांची काळजीही गावकऱ्यांना सतावत होती. मुंबईकरांनी घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, अशी आशा गावकरी करत होते.तरीही जीवाच्या काळजीने मुंबईकर गावी दाखल झाले. गावी आलेल्या मुंबईकरांना सापत्न वागणूक न देता गावकरी एकत्र आले. गावाच्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, समाज मंदिर सज्ज ठेवली. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची घरे उभारून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. मुंबईकर आपलेच आहेत, असे मानून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे गावांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

  • पाली गावात मुंबईकरांच्या स्वागतासाठी रंगले रस्ते

मुंबईत असलेल्या अपुऱ्या सुविधा व गावाकडे वाटणारी सुरक्षितता यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी कोकणात धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असल्याने सुरूवातीला गावकरी थोडेफार बिथरले होते. रत्नागिरी तालुक्यातील पाली गावात गावकऱ्यांनी आपल्या गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर घोषवाक्य लिहून त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी गावकरी सज्ज आहेत.

  • मुुंबईकरांकडून स्वच्छता

गावात आलेल्या मुंबईकरांना शाळा किंवा समाज मंदिरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी शाळांमध्येच १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ दिवस बसून करायचे काय? असे ठरवून मुंबईकरांनी शाळेची साफसफाई करण्याचा वसा हाती घेतला आहे. राजापूर, गुहागर तालुक्यातील शाळांमध्ये स्वच्छतेचे काम हाती घेऊन शाळेचे रूपडेच पालटून टाकले आहे.

  • गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभारली तात्पुरती घरे

गुहागर तालुक्यातील कोळवली गावाने एक नवा आदर्श निर्माण करत तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील प्रत्येक वाडीने जबाबदारी घेऊन आपल्या वाडीतील चाकरमान्यांसाठी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामस्थांनी शेतात लाकडी खांब उभे केले, त्यानंतर झाडांच्या फांद्यापासून भिंती आकाराला आल्या, ऊन-पावसापासून रक्षण व्हावे, यासाठी पत्र्याचे छप्पर घालण्यात आले.

स्वत:ची दिली घरेएकीकडे मुंबईकरांना विरोध असतानाच मुंबईकर आपलेच आहेत या भावनेने मुंबईकरांना स्वत:चे घरही दिली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील देवस्थळी कुटुंबियांनी आपले रिकामे घर, तर माभळे काष्टेवाडीतील संतोष काष्टे यांनी राहती दोन घरे मुंबईकरांना दिली आहेत. जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तर तुरळ सुवरेवाडी येथे गावाबाहेर झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाला आपल्या घरी नेले.

गावी येणाऱ्या मुंबईकरांना चांगली वागणूक मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून समन्वय पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामस्थ आहेत. त्यामुळे मुंबईकर व गावकरी यांच्यात समन्वय साधून तंटे न होण्यास मदत झाली आहे. मुंबईकरांचे स्वागतच होत आहे.- विशाल गायकवाड,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी