शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘जागतिक कविता दिवस’ : रत्नागिरीत नवसाहित्याचे स्वागत, संतगाथा ग्रंथांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:25 IST

नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत गुढी उभारून चैत्र प्रतिपदेला केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहित्य निर्माण व्हावे आणि अशा नवसाहित्याचे स्वागत करण्यास जनसेवा ग्रंथालय नेहमीच पुढे असेल, या उद्देशाने ही प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली होती.

ठळक मुद्देसाहित्यिक गुढीतून नवसाहित्याचे स्वागतसंतगाथा व मराठी साहित्यातील ग्रंथांचे पूजन.

रत्नागिरी :  युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले. नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच  साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहित्य निर्माण व्हावे आणि अशा नवसाहित्याचे स्वागत करण्यास जनसेवा ग्रंथालय नेहमीच पुढे असेल, या उद्देशाने ही प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली होती.गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी मान्यवरांच्या उपस्थितीत उभी करण्यात आली. यावेळी गुढीला मराठी साहित्यातील विविध प्रकारांपैकी बालसाहित्य, युवा, ललित, वैचारिक अशी मासिके, पुस्तके यांची माळ बांधण्यात आली होती. साहित्यिक पताका हे या गुढीचे खास आकर्षण होते.

जनसेवाचे वाचक सरपोतदार यांनी स्वत: मराठीतील महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर ते विद्यमान नामवंत लेखकांची नावे, त्यांचा साहित्यिक कालखंड व साहित्यसंपदा अशी माहिती भगव्या पताकांवर लिहिली होती. अशा या नाविन्यपूर्ण साहित्यिक पताकांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या शुभारंभी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी संतगाथा व मराठी साहित्यातील ग्रंथांचे पूजन केले. या साहित्यिक गुढीच्या उभारणीमागील हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, जनसेवा ग्रंथालय रत्नागिरीची वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नरत आहे. त्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवित आले आहे.

गुढी ही चांगल्या गोष्टीच्या स्वागतासाठी उभारली जाते. नवनिर्मितीच्या स्वागताला उभारली जाते. जनसेवा ग्रंथालयाने ती रत्नागिरीतील साहित्यिक चळवळ वृध्दींगत व्हावी, तसेच नवसाहित्यिक आणि त्यांच्या नवसाहित्य निर्मितीच्या स्वागतासाठी उभारली आहे. कोकणात आणि संपूर्ण रत्नागिरीत हा एकमेव आणि पहिलाच उपक्रम आहे. या गुढी उभारणीबरोबरच वाचकांसाठी यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.या कार्यक्रमाला ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य काळे, नानिवडेकर, भाग्यश्री पटवर्धन, अमोल पालये, ग्रंथपाल सिनकर, वाचक, सभासद, रत्नागिरीकर नागरिक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्य